Zopala By V.P.Kale (झोपाळा)
Zopala By V.P.Kale (झोपाळा)
मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन म्हणजे हा कथासंग्रह मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा शोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.