Yugpravartak ShivajiMaharaj yanche Charitra+Shivrayanchi Yuddhaniti+Mahatma Phule krut Pavada Chatrapati Shivajiraje Bhosale yancha+Kshatriyakulawant Sadhu+Shri Shambhuchhatrapati Smarak Granth | By Vasudeo Krushna Bhave
Yugpravartak ShivajiMaharaj yanche Charitra+Shivrayanchi Yuddhaniti+Mahatma Phule krut Pavada Chatrapati Shivajiraje Bhosale yancha+Kshatriyakulawant Sadhu+Shri Shambhuchhatrapati Smarak Granth | By Vasudeo Krushna Bhave
Couldn't load pickup availability
शिवाजी महाराजांच्या काळातील विविध पत्रांचा उल्लेख करण्यात आला होता आणि युगप्रवर्तक शिवाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे चरित्र वासुदेव कृष्ण भावे यांनी लिहिले होते.
शिवाजी महाराजांच्या एका चरित्रातून, मराठ्यांबद्दल माहिती मिळते, जिथे मुघल, निजाम आणि इतरांची माहिती मराठी व्यतिरिक्त इतर लिपीत असल्याने त्यांना माहिती नसते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळातल्या सर्व यावनी सत्तांना आव्हान देऊन त्यांना टाचेखाली दाबून 'हिंदवी स्वराज्याची' स्थापना केली.
त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या सर्व संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. ओखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ते संकटांच्या वादळात अढळ, अढळपणे सुभे राहिले नि अपराजित ठरले.
छ. शिवाजी महाराजांचे धोरणीपण, त्यांनी केलेली मुलुखगिरी, बलाढ्य शत्रूशी दिलेला लढा, स्वकीयांशी त्यांना करावा लागलेला संघर्ष, प्रसंगपरत्त्वे स्वकीय आणि विरोधी बाजूच्या शत्रूबाबत अंगिकारलेली क्षमाशीलतेचे धोरण हे सारेच शिवाजीराजांच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांचे दर्शन म. फुले या पोवाड्यामधून वाचकांना घडवतात. तसेच मातोश्री जिजाऊ यांचे संसारिक जीवन, शिवबांवर त्यांनी केलेले संस्कार आणि त्या संस्कारातून शिवबांमधील क्षात्रवृत्ती जागृत होणे व शिवाबांचे व्यक्तिमत्व साक्षात होणे हे सारे घटना-प्रसंग पोवाड्यातून पुनर्निर्मित झाले आहेत. – डॉ. विश्वनाथ शिंदे
छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का ? बुधभूषण ग्रंथात नेमके काय लिहलंय ? आज हा ग्रंथ आहे कुठे ? तब्बल नऊ वर्ष मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.
Share
