Skip to product information
1 of 4

Yashwantrao Holkar + Senapati Hindurao Ghorpade + Mahapurushanchya Najretun Shivray | 3 book Set | Offer ( Amhi Ghadalo Vachanane Book Free, Pen & 5 Bookmark Free)

Yashwantrao Holkar + Senapati Hindurao Ghorpade + Mahapurushanchya Najretun Shivray | 3 book Set | Offer ( Amhi Ghadalo Vachanane Book Free, Pen & 5 Bookmark Free)

Regular price Rs. 1,260.00
Regular price Rs. 1,500.00 Sale price Rs. 1,260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

यशवंतराव होळकर + सेनापती हिंदुराव घोरपडे+ महापुरूषांच्या नजरेतून शिवराय | 3 पुस्तकांचा सेट  | Offer - ( मोफत -आम्ही घडलो वाचनाने पुस्तक , पेन , ५ सुंदर कॅलिग्राफी केलेला बुकमार्क )

१)यशवंतराव होळकर (Hardcover) - महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विराट व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करणारा हा ग्रंथ, महाराष्ट्राच्या इतिहासातील एका सोनेरी पानाचे दर्शन घडवितो. महाराजा यशवंतराव होळकर, मराठा साम्राज्याचे एक अतुलनीय योद्धा, कुशल रणनीतिज्ञ आणि लोकहितैषी राजा होते. त्यांच्या अद्वितीय शौर्याची आणि राजनैतिक दूरदृष्टीची कहाणी हा ग्रंथ सांगतो. यशवंतराव होळकर यांचे जीवन निवडक लढाई, राजकारणी उतार-चढाव, साम्राज्य विस्तार आणि सामाजिक कल्याणकारी कामांच्या गोष्टींनी भरलेले आहे. 

2) सेनापती हिंदुराव घोरपडे(Paperback) -मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थानी गौरवास्पद ठरावी अशीच होती. म्हाळोजी घोरपडे आणि संताजी घोरपडे यांनी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ रणांगणात लढता लढता देह ठेवले तर म्हाळोजींचे सुपुत्र आणि संताजींचे बंधू हिंदुराव घोरपडे यांनी दक्षिण भारतात मर्दुमकी गाजवून गुत्ती - सोंडूर हा प्रदेश काबीज केला. पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मुरारराव घोरपडे यांनी इंग्रज, फ्रेंच, हैदर आणि निजाम या सर्वाना पुरून उरावे अशी मुत्सद्देगिरी आणि लढाऊ बाणा दाखवला. दक्षिणेत रुजलेल्या या हिंदुराव घोरपडे घराण्याच्या युद्धकौशल्याचे आणि राजकीय मुत्सद्देगिरीची प्रशंसा खुद्ध इंग्रज आणि फ्रेंच इतिहासकारांना व राज्यकर्त्यांनाही करावी लागली. सर यदुनाथ सरकार आणि रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्यासारख्या मान्यवर इतिहासकारांनी म्हटले आहे की, 'जोपर्यंत घोरपडे घराण्याच्या दक्षिण भारतातील कामगिरीचा आणि महत्वपूर्ण संबंधित घटनांचा इतिहास लिहिला जाणार नाही, तोपर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहून पूर्ण होणार नाही.

3)महापुरूषांच्या नजरेतून शिवराय- (Hardcover)

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या अस्मितेचे यथार्थ प्रतीक असणारे भारतभूमीचे खरेखुरे पुत्र होते.
स्वामी विवेकानंद

वास्तविक शिवाजी महाराजांची साधना म्हणजे साऱ्या महाराष्ट्राच्या धर्म-साधनेचा एक विशेष प्रकाश आहे.
- रवींद्रनाथ टागोर

शौर्य आणि धैर्य या गुणांना चारित्र्य व विधायक दृष्टी या गुणांची जोड मिळाल्यानेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते झाले.
यशवंतराव चव्हाण

आपणास स्वातंत्र्य हवे असेल, तर आपणास शिवाजी महाराजांच्या मार्गाने जावे लागेल.
- सुभाषचंद्र बोस

View full details