Yashwantrao Chavan Set: Sahyadriche Vare+ Krishnakanth Yashwantrav Chavan+ Runanubandha | Yashwantrao Chavan+
Yashwantrao Chavan Set: Sahyadriche Vare+ Krishnakanth Yashwantrav Chavan+ Runanubandha | Yashwantrao Chavan+
Couldn't load pickup availability
माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.”
लढवल्या. कधी चुरशीच्या, कधी थोडया मतांनी, कधी लाख मतांनी, तर कधी बिनविरोध अशा सर्व निवडणुका मी जिंकल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीतील अनुभव वेगळा, राजकीय कसोटया वेगळ्या, त्यावेळचे विरोधी राजकीय पक्षही वेगळे, अशा होत्या. पण १९४६ सारखी सर्वमान्य निवडणूक कधीच झाली नाही.
मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
Share
