Yanni Jag Badalal : Facebook By Atul Kahate ( यांनी जग बदललं : फेसबुक )
Yanni Jag Badalal : Facebook By Atul Kahate ( यांनी जग बदललं : फेसबुक )
Couldn't load pickup availability
‘जग बदलून टाकणारं काही करायची संधी असताना शिकत बसण्यात काय अर्थ आहे?’ असा प्रश्न आपल्या वयाच्या 19-20 व्या वर्षी विचारणार्या मार्क झाकरबर्ग नावाच्या विलक्षण बुद्धीच्या पण प्रचंड एकलकोंडा असलेल्या अमेरिकन युवकानं ‘फेसबुक’ नावाची वेब साईट सुरू केली. हॉवर्ड विद्यापीठामधलं आपलं शिक्षण अर्धवट टाकून झाकरबर्गनं केलेला हा उद्योग सुरुवातीपासूनच प्रचंड यशस्वी ठरला. सुरुवातीला विद्यापीठं आणि कॉलेजेस इथं फेसबुक लोकप्रिय झाली. पण लवकरच फेसबुकनं सगळ्या जगालाच विळखा घातला. आता तर जेमतेम 8 वर्षांच्या अस्तित्वामध्ये या कंपनीचं मूल्य तब्बल 8000 कोटी डॉलर्स आहे असं जग मानतं! जगभरात सुमारे 80 कोटी लोक फेसबुक वापरतात असं मानलं जातं! म्हणजेच कित्येक मोठमोठ्या देशांच्या लोकसंख्येहून जास्त लोक फेसबुकचे ‘नागरिक’ आहेत!
झाकरबर्गच्या या फेसबुकविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात :
* हा झाकरबर्ग नक्की कसा आहे?
* फेसबुकला पैसे कुठून मिळतात?
* सगळ्या जगाला वेड लावण्यासारखं फेसबुकमध्ये काय आहे?
* फेसबुकचा आत्तापर्यंतचा प्रवास नक्की कसा होता?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं, फेसबुकच्या प्रवासाचा आलेख रेखाटणारं आणि फेसबुकची सक्सेस स्टोरी सांगणारं हे पुस्तक आहे.
Share
