Skip to product information
1 of 1

Walking On The Edge By Prasad Nikte (वॉकिंग ऑन द एज)

Walking On The Edge By Prasad Nikte (वॉकिंग ऑन द एज)

Regular price Rs. 425.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 425.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

सह्याद्रीच्या द-याखो-यांवर प्रेम करणारा एक भटक्या. त्याने ध्यास घेतला, सह्याद्री घाटमाथ्याच्या धारेवरून उभा महाराष्ट्र चालत जायचं. उत्तरेकडून दक्षिणेकडे. कडेकपारीतले तब्बल हजार किलोमीटर!
हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो ७५ दिवस एकट्याने चालत राहिला. रोज २०-२५ किलोमीटरची तंगडतोड केल्यावर जे गाव लागेल तिथे मुक्काम करायचा, जे घर आस्थेने विचारपूस करेल तिथे राहायचं आणि जे पानात वाढलं जाईल ते खायचं. रात्री पाठ टेकायची की दुस-या दिवशी पुन्हा पुढचा प्रवास सुरू. अशा पायपिटीची ही गोष्ट.
या भ्रमंतीत जसं सह्याद्रीचं रौद्र रूप सामोरं आलं, तसंच द-याखो-यांमध्ये पठारांवर राहणारी माणसं आणि त्यांच्यातली माणुसकी भेटली. त्याच वेळी रोजच्या अनिश्चिततेमुळे मनात खोलवर दडून बसलेल्या भीतीशीही सामना करावा लागला.
पठाराचा काठ आणि आव्हानं अशा दोन्ही अर्थाने `एज्` वरून केलेल्या भटकंतीच्या अनुभवांची ही शिदोरी.. वॉकिंग ऑन द एज्.

View full details