Waikar Bhataji By Ramchandra Vinayak Tilekar
Waikar Bhataji By Ramchandra Vinayak Tilekar
Couldn't load pickup availability
इंग्रजीतील प्रसिद्ध लेखक 'ऑलिव्हर गोल्डस्मिथ' यांच्या 'विकार ऑफ वेकफिल्ड' ह्या पुस्तकाचा भावानुवाद म्हणजे 'वाईकर भटजी' होय. भावानुवाद हा शब्द मुद्दाम वापरला, कारण; महाराष्ट्रातील परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी त्यात योग्य तो बदल केलेला आहे. 'धनुर्धारी' किंवा रामचंद्र विनायक टिकेकर हे, शंभर वर्षांपूर्वी गाजलेले लेखक होते. प्रथम ही कादंबरी, 'विविध ज्ञान विस्तार', या मासिकात क्रमाने आली होती. त्यावेळी, टिकेकर यांनी 'धनुर्धारी' हे टोपणनाव घेतले होते, व तेच पुढे कायम राहिले. शंभर वर्षांपूर्वीच्या समाजाचे चित्रण यात आलेले असल्याने, तत्कालीन समाजस्थिती महाराष्ट्रातील लोकांना समजण्यासाठी ही कादंबरी फार उपयोगी पडेल. मराठी वाङमयात जी पुस्तके विदग्ध वाङमय व चिरकाल टिकणारी आहेत. त्यात हे पुस्तक मोडते. 'विकार ऑफ वेकफील्ड' मध्येही 'प्रिमरोज' हा 'विकार' म्हणजे भटजीच होता. या पुस्तकाच्या सुरुवातीला श्री. गोविंद वासुदेव कानिटकर यांची विवेचक प्रस्तावना जोडली आहे तीही वाचकांनी जरूर पहावी. मराठीतील विदग्धवाङमय प्रकाशित करण्याच्या 'वरदा बुक्स' च्या धोरणानुसार हे पुस्तक सादर करीत आहोत.
Share
