Vyaktimatva Vikas 5 Books Set By Manoj Ambike, Prasad Dhapre (व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त अशा "पाच" पुस्तकांचा संच...)
Vyaktimatva Vikas 5 Books Set By Manoj Ambike, Prasad Dhapre (व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त अशा "पाच" पुस्तकांचा संच...)
*ध्येयामागील ध्येय (गोल सेटिंग) | वेळेचे व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) | स्मार्ट निर्णय कसे घ्यावे (डिसिजन मेकिंग) | पॉवर ऑफ कॉन्फिडन्स (कॉन्फिडन्स) | सामर्थ्यशाली लीडर * (लीडरशीप) या विषयावरील पाच पुस्तकांचा संच.
पुस्तकांविषयी........
1) ध्येया मागील ध्येय...
(गोलसेटिंगची हुकमी पद्धत)
लेखक: मनोज अंबिके
पाने:- 144
खरं तर कुठलंही यश हे अपघाताने कधीच मिळत नाही. त्यामागे अभ्यासपूर्वक अशी निश्चित योजना असायला लागते, ध्येययोजना असावी लागते. आणि जर ती निश्चित ध्येययोजना असेल तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्की पोहोचता.
अनेकदा ध्येय ठरवताना ते सखोल विचार करून ठरवलं जात नाही. खरं तर कुठलंही ध्येय ठरवताना त्याच्यामागे काय ध्येय असावं म्हणजेच ध्येयामागील ध्येय काय असावं हा विचार होणं तितकंच आवश्यक आहे. जेव्हा आपण ध्येयाबरोबर ध्येयामागील ध्येयाचादेखील विचार करतो आणि ध्येयनिश्चिती करतो त्या वेळेस खऱ्या अर्थी विकास होतो.
या पुस्तकात.....
✒️ध्येय कसे ठरवाल
✒️ अशी करा ध्येयप्राप्ती
✒️अशी निर्माण करा निश्चयशक्ती
✒️नियोजन वेळेचे आणि शक्तीचे
✒️अपयशावर यश कसे मिळवावे ?
✒️मल्टिटास्कींगचे तंत्र
✒️चालढकल वृत्तीवर विजय
✒️लक्ष्यपूर्तीसाठी शस्त्रं
2) वेळेचे व्यवस्थापन...
(वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा)
लेखक:- प्रसाद ढापरे
पाने:- 144
निसर्गाने वेळ वाटण्यात काहीच भेदभाव केला नाही. त्याने सर्वांनाच एकसमान वेळ दिला आहे. मग ते नुकतेच जन्मलेले बाळ असो वा ऐंशी वर्षांचा वृद्ध, शालेय विद्यार्थी असो वा एखाद्या देशाचे पंतप्रधान.
निसर्गाने ना गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला, ना त्याची पद-प्रतिष्ठा बघितली. ना पुरुष-स्त्री असा फरक केला, ना लहान-थोर अशी विभागणी केली. त्याने सर्वांवर 'रोज २४ तास' अशी वेळेची उधळण केली. या वेळेचा कसा विनियोग ही गोष्ट मात्र त्याने आपल्यावर सोपवली. काही लोकांनी करायचा, याचा फारच समर्पक वापर केला, तर काहीजणांनी याची दखलही घेतली नाही. निसर्गाने जरी सर्वांना एकसमान वेळ दिली असली तरी तिचा वापर वेगवेगळा करायची मुभा मनुष्याला दिली, त्यामुळे वेळेचा सदुपयोग व दुरुपयोग व्हायला लागला.
वेळ सर्वांकडे एकसारखाच आहे.कोणालाच तो कमी-जास्त मिळालेला नाही, पण त्याचा वापर करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र नक्कीच वेगळी आहे आणि त्यामुळे त्यांना त्यातून मिळणारा मोबदलाही निश्चितच वेगळा असतो. त्यामुळेच या २४ तासांत काहीजणांनी जग जिंकले, तर काहीजण होते तेही हरवून बसले. आता हे आपल्याला ठरवायचे आहे, की आपण कोणाच्या पंगतीला जाऊन बसणार. या पुस्तकाचा प्रयत्न हा वेळेच्या व्यवस्थापनेद्वारे जग जिंकण्याकडील वाटचालीचा आहे.
3) स्मार्ट निर्णय कसे घ्यावे
(कोणत्याही परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याची कला.)
लेखक: मनोज अंबिके.
पाने:- 168
खरं तर या जगात कुठलाही निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतो. 'मी जो निर्णय घेतला तो निर्णय अयोग्य आहे', हा विचार अयोग्य असतो. निर्णय चुकीचा की बरोबर यापेक्षा 'मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे' हा विचार जर परिवर्तीत करता आला, बदलता आला तर तुम्ही घेतलेला निर्णय समर्पक आणि योग्य ठरवता येतो. हे पुस्तक त्यासाठीच हे मदत करेल.
या पुस्तकाचं नाव सुरुवातीला 'निर्णय, नियोजन आणि जबाबदारी’ असं द्यायचं होतं. कारण या पुस्तकाची परिपूर्णता त्यातच आहे. तुम्ही जेव्हा निर्णय घेता तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी कशी घेता आणि त्या निर्णयाच्या जबाबदारी बरोबर तो निर्णय योग्य ठरावा म्हणून आपलं नियोजन कसं होतं यावरच तो निर्णय योग्य की अयोग्य, हे अवलंबून असतं.
या पुस्तकात अनेक तंत्रं आहेत, टेक्निक्स आहेत, पद्धती आहेत, मार्ग आहेत आणि काही सूत्रं पण आहेत. या सर्वाचा उपयोग निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत होईल. काही सूत्रं, काही तंत्रं निर्णय कसा घ्यावा, हे सांगतील तर काही सूत्रं, काही तंत्रं हे मात्र निर्णय घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची गरज नाही हे सांगतील.
4) पॉवर ऑफ कॉन्फिडन्स
(स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी.)
लेखक: मनोज अंबिके.
पाने:- 160
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व स्वत:मध्ये व दुसऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी लेखक या पुस्तकात बेधडक व्हा, अपयशातील यश, विश्वासाची शक्ती, बलस्थान ओळखा, वेगळेपण ओळखा, आत्मविश्वासाचे शत्रू, स्वत:वर विश्वास ठेवा, दृष्टीतला आत्मविश्वास, संवादातून आत्मविश्वास, पडा पण ध्येयाच्या दिशेने, नाही म्हणायचा अधिकार अशी ११ सूत्रे सांगतात. तसेच एकूण १८ प्रकरणातून ते आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करतात. ‘विश्वास’ हे माणसाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे असे ते म्हणतात. या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा आहे की, सर्व प्रश्न, शंका, समस्या, शत्रूंपासून विश्वासाची सुटका करून आत्मविश्वासाला मोकळं करणं असं लेखक प्रस्तावनेत स्पष्ट करतात.
‘आपण नेमकं काय करायला हवं’ हे या पुस्तकातील पायऱ्यांमधून व सूत्रांमधून नक्की समजेल. तसेच सर्व प्रकरणातील विविध मुद्दे आपल्याला आपल्या जवळचे वाटतील. ‘तुझे आहे तुजपाशी..’ हा अनुभव आपल्याला हे पूर्ण पुस्तक वाचताना येतो. पुन्हा पुन्हा वाचावे असे हे पुस्तक आपला आत्मविश्वास दृढ केल्याशिवाय राहाणार नाही.
संधी आली की ती न गमावतां, कोणाचीही वाट न पाहाता ती स्वीकारली पाहिजे. हे यातून नक्की समजेल.
5) सामर्थ्यशाली लीडर...
(कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी.)
लेखक: मनोज अंबिके.