Volga Te Ganga By Rahul Sankrityayan (English)
Volga Te Ganga By Rahul Sankrityayan (English)
Couldn't load pickup availability
‘व्होल्गा ते गंगा’ हे रोचक पुस्तक एकाच वेळी तुम्हाला धर्म, संस्कृती, इतिहास अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत फिरवून आणतं. २० प्रकरणांचं हे पुस्तक हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं उत्खनन करत काळाच्या टप्प्यांचा वेध घेतं. आर्यांपासून ते मोगल सत्ता, इंग्रजी आमदानीचा काळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा संघर्ष; एकाच पुस्तकात एवढे सगळे पैलू आहेत. केवळ इतिहासाचे टप्पे उलगडणं एवढाच या पुस्तकाचा हेतू नाही. त्या काळातल्या लोकांची स्वप्नं, विचार, धारणा या गोष्टी वाचकांसमोर येत राहतात. साम्राज्यांचा उदय कसा होतो आणि ती लयाला कशी जातात, विचारधारा कशा जन्माला येतात, माणूस काळानुरूप कसा बदलत जातो, बदलांना तो सामोरं कसं जातो याचा शोध म्हणूनही या पुस्तकाकडे पाहिलं जातं.
पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात एक नवी संस्कृती, विचारप्रणाली यांचा परिचय वाचकांना होत राहतो. ख्रिस्तपूर्व काळापासून ते विसाव्या शतकाच्या आरंभीची काही दशकं असा विशाल पट घेऊन मानवी समाजाच्या प्रगतीचं ललितकथांच्या अंगाने त्यांनी केलेलं चित्रण हे विलक्षण लेखनसामर्थ्याचं उदाहरण आहे. माणूस आज जिथं आहे तिथं पोहोचण्यापर्यंतचा त्याचा प्रवास, संघर्ष आणि मानवी समाजाच्या प्रगतीचं तात्त्विक विवेचन या अंगाने हा ग्रंथ आजही तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. भूतकाळाचं उत्खनन करत असताना हे पुस्तक वाचकाला नवं काही देऊन जातं, हे त्याचं यश .
Share
