Vishwavasuchi Nirupane : Nave Lalitgadya By Vishwas Vasekar (विश्वावसूची निरूपणे : नवे ललितगद्य)
Vishwavasuchi Nirupane : Nave Lalitgadya By Vishwas Vasekar (विश्वावसूची निरूपणे : नवे ललितगद्य)
Couldn't load pickup availability
ललितगद्य हा लेखकांसाठी जेवढा सोपा तितकाच त्याच्या समीक्षकांसाठी अत्यंत आव्हानात्मक वाङ्मयप्रकार आहे. वेद जसे परमेश्वराचे वर्णन ‘नेति नेति’च्या भाषेत करतात तसे समीक्षकांना 'हा म्हणजे कथा नाही', 'हा म्हणजे कविता नाही' अशा भाषेत याच्याबद्दल बोलावे लागते. वसेकरांनी प्रस्तुत ग्रंथात हे आव्हान लिलया पेलत ललितगद्याची उत्तम चिकित्सा केली आहे. लघुनिबंधाने कात टाकल्यानंतरच्या नव्या ललितगद्याचे मर्मस्पर्शी आकलन आणि मूल्यमापन करताना वसेकरांनी उपयोजित समीक्षेचा नवा मानदंड निर्माण केला आहे. केवळ मराठी वाङ्मयाच्या विद्यार्थी आणि अभ्यासकांनाच हा ग्रंथ उपयुक्त ठरेल असे नाही तर ललितगद्य लिहू पाहणाऱ्या लेखकांनाही तो मार्गदर्शक ठरावा. म्हणूनच याचे स्थान ग्रंथालयाच्या कपाटात राहणारे नसून संबंधितांच्या टेबलावर सदैव राहील असेच आहे. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे