Vishwatil Samarthyashali Striya By Jyoti Dharmadhikari (विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया)
Vishwatil Samarthyashali Striya By Jyoti Dharmadhikari (विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया)
Couldn't load pickup availability
‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते’, हे आपण वर्षानुवर्षं वाचत आलो आणि ‘पुरुषामागे’ असण्यातच स्त्रियांनी धन्यताही मानली. पण आता स्त्री जर सक्षम असेल तर तिचे सामर्थ्य जगासमोर येण्यासाठी आणि ते जगालाव उपयुक्त ठरण्यासाठी पुरुषानेही तिच्या पाठीशी राहण्यास काहीच कमीपणा नाही तर मनाचा मोठेपणा आहे. हे लिखाण वाचून स्त्री-पुरुष समानतेचा आणि परस्पर सहकार्याचा अत्यंत आवश्यक असा नवा विचार नकळत मनात मूळ धरू लागतो.
आज एकविसाव्या शतकातही ‘बापघर आणि आपघर’ - ‘माहेर आणि सासर’ या पारंपारिक व्यवस्थेतच अजूनही बंदिस्त असणार्या किंवा स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध घेणार्या प्रत्येक स्त्रीला प्रेरक ठरेल, आत्मसन्मानाची जाणीव करून देईल, प्रयत्नांची नवी वाट शोधायला लावील असं हे पुस्तक आहे. आत्माविष्कार करताना कोणत्याही वयाच्या-वंशाच्या-क्षेत्रातील स्त्रीला या 11 स्त्रिया आधारस्तंभ वाटतील, प्रकाशवाट दाखवितील आणि यातच या पुस्तकाची सार्थकता दडलेली आहे, असं मला वाटतं.
- डॉ. रमा मराठे
Share
