Vishnu Samjun Ghetana By Pradeep Mhaisekar (विष्णू समजून घेताना)
Vishnu Samjun Ghetana By Pradeep Mhaisekar (विष्णू समजून घेताना)
Couldn't load pickup availability
वर्तमान समाजामध्ये, विशेषतः तरुणांमध्ये वैष्णव संप्रदाय विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. समाज माध्यमांवर सहज उपलब्ध होणारी विष्णु विभवांची विविध चित्रे - छायाचित्रे अनेकांची मने आकर्षून घेतात. परंतु असे आकर्षण म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. इतिहासामध्ये पाहिले असता विष्णूच्या मूर्तिरूपी प्रतिमा अशा प्रकारच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु होत्या हे दिसून येते. सौंदर्यशास्त्राचे दर्शन घडवणाऱ्या अनेक उत्तमोत्तम प्राचीन विष्णु प्रतिमा देखील आपण अनेकदा पाहतो. या प्रतिमांचे अध्ययन करताना त्यांची शैली, निर्मितीचा कालखंड, धर्मग्रंथातील उल्लेख, इत्यादी अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. या अध्ययनास आपण 'मूर्तिशास्त्र' म्हणतो. परंतु दुर्दैवाने आज मूर्तिशास्त्र हा विषय फक्त मूर्ती ओळखण्यापूरता मर्यादित झाल्याचे दिसून येते. या गहन विषयाची व्याप्ती प्रचंड असून यामध्ये प्रतिके, आयुधे, कला, पौराणिक कथा, स्थापत्य, धर्मशास्त्र, संप्रदाय, तत्त्वज्ञान अशा विविध अंगांचा चिकित्सक अभ्यास आवश्यक असतो. याच पद्धतीचा अवलंब करत विष्णुच्या मूर्तिशास्त्राविषयक एक अद्वितीय दृष्टिकोन प्रस्तुत ग्रंथातून मांडण्यात आला आहे.
Share
