Vimukt Bhatakyanche Swatantrya ? By Lakshman Gaikwad (विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य ?)
Vimukt Bhatakyanche Swatantrya ? By Lakshman Gaikwad (विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य ?)
Couldn't load pickup availability
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे गावगाड्यातल्या अस्पृश्य जातींना संविधानातला अधिकार मिळाला. ठक्कर बप्पांमुळे जंगलातल्या आदिवासींना संविधानाच्या अंतर्गत संरक्षण मिळाले. गावगाड्यात अस्पृश्य जातीना मांगवाडा, चांभारवाडा, ढोरवाडा, महारवाडा होता; तर जंगलात राहणाऱ्या आदिवासींना जंगलामध्ये राहण्यासाठी पाडा होता; पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या कोट्यवधी गुन्हेगार जमातींच्या लोकांना जंगलात ना पाडा होता ना गावगाड्यात वाडा होता. आईच्या पोटातून जन्मलेले मूल कुठल्या गावात जन्माला आले याची साधी नोंदही नव्हती. त्यांच्या विशेष सामाजिक सुधारणांसाठी काही तरतूदही नव्हती. ही स्वतंत्र भारताची शोकांतिकाच म्हणावी लागेल. गुन्हेगार जमातींच्या लोकांना आजही कुठल्याही प्रकारचे संरक्षण दिले गेले नसल्याने 'धोबी का कुत्ता न घर का ना घाट का' अशी अवस्था देशभर विमुक्त भटक्यांची पाहायला मिळते. निरक्षर, अज्ञानी, गावकुसाबाहेर, गावगाड्यामध्ये स्थान नसलेल्या या समाजाला विकासापासून कायमचे दूर ठेवण्यात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राने तर 'विमुक्त भटक्या जमाती असे गोंडस नाव' त्यास देऊन एक प्रकारची बोळवण केली आहे. त्यांच्या खऱ्या स्वातंत्र्यापुढे अजूनही प्रश्नचिन्हच उभे आहे.
Share
