Skip to product information
1 of 1

Vijaynagarcha Tenaliram By D.G.Kulkarni (विजयनगरचा तेनालीराम - द. जी. कुलकर्णी )

Vijaynagarcha Tenaliram By D.G.Kulkarni (विजयनगरचा तेनालीराम - द. जी. कुलकर्णी )

Regular price Rs. 20.00
Regular price Rs. 20.00 Sale price Rs. 20.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

चतुर बिरबल जसा बादशहा अकबराच्या दरबारात होता, तसाच तेनालीराम विजयनगरच्या सम्राट कृष्णदेवराय याच्या दरबारात होता. तेनालीराम हा बिरबलासारखाच बुद्धिमान आणि चतुर होता, तसेच हजरजबाबी होता. त्याच्या चातुर्याच्या आणि असामान्य बुद्धीच्या जोरावर त्याने सम्राट कृष्णदेवराय याच्या दरबारात मानाचे स्थान मिळवले होते. ह्या आपल्या अंगच्या गुणांच्या सहाय्याने त्याने त्या दरबाराची लाज कितीतरी प्रसंगी राखली होती. तसेच आपल्या विनोदी बुद्धीने-चेष्टेखोर स्वभावाने त्याने सम्राट कृष्णदेवराय आणि त्याच्या सर्व दरबाराची करमणूक कितीतरी वेळा केली होती. इतकेच नव्हे तर त्या करमणुकीतून, चेष्टेतून तो एखाद्याची चूक मोठ्या खुबीने सर्वांना दाखवून देत असे. यातून प्रत्यक्ष कृष्णदेवरायाचीही सुटका झाली नव्हती ! तेनालीरामच्या अनेक कथा आंध्रप्रदेशात शेकडो वर्षे झाली तरी अजूनही प्रसिद्ध आहेत, लोकप्रिय आहेत. मराठी मुला-मुलींसाठी त्यातील काही निवडक कथा सोप्या भाषेत या पुस्तकात दिल्या आहेत. अगदी सोपी भाषा, मोठा टाईप आणि भरपूर चित्रे या सर्वांमुळे हे पुस्तक मुला-मुलींना अगदी आकर्षक वाटेल. हे वाचून त्यांचे मनोरंजन तर होईलच, पण तेनालीरामसारखे चातुर्य, हजरजबाबीपणा त्यांच्या अंगी यायला उपयोग होईल!

पाने 48 | 

View full details