Skip to product information
1 of 3

Vidya Ambike 3 Book set ( Best Seller Book) (विद्या अंबिके यांची गाजलेली पुस्तके )

Vidya Ambike 3 Book set ( Best Seller Book) (विद्या अंबिके यांची गाजलेली पुस्तके )

Regular price Rs. 549.00
Regular price Rs. 645.00 Sale price Rs. 549.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

1.नारायण मूर्ती (Narayan Murty)- 175/-
नारायण मूर्ती यांच्या वैयक्तिक संग्रहातील निवडक छायाचित्रांसह फॉर्च्यून मॅगझिनमध्ये 2012 साली ‘आपल्या काळातील 12 सर्वोत्तम उद्योजकां’मध्ये निवड झालेले नागावरा रामाराव नारायण मूर्ती हे एनआर नारायण मूर्ती नावाने ओळखले जातात. भारतीय उद्योजकांमध्ये मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित असे हे नाव. 1981 साली दहा हजार रुपयांच्या जुजबी भांडवलावर आपल्या सहा व्यावसायिक मित्रांबरोबर मिळून सुरू केलेल्या इन्फोसिसचे ते संस्थापक आहेत, जी इन्फोसिस आता जागतिक सॉफ्टवेअर कन्सल्टींग कंपनी आहे. एनआरएनएम यांनी या कंपनीला फक्त जगातील अव्वल आयटी कंपनीच बनवली नाही तर त्यांनी हेही दाखवून दिले, की मूल्यांमध्ये कोणतीही तडजोड न करता, कोणतेही नियम न वाकवता, नैतिकतेने व्यवसाय करून यश मिळवता येते. हे पुस्तक तुम्हाला अशा एका मुलाच्या चित्तवेधक प्रवासाकडे घेऊन जाते, ज्याने सतराव्या वर्षी, वडलांकडे फी भरण्याचे पैसे नसल्यामुळे प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मिळालेल्या प्रवेशाचा त्याग केला.

2.मिनी हॅबीटस् (Mini Habits)- 195/-
छोट्या कृतीतूनच होते मोठ्या बदलाची सुरुवात प्रत्येकालाच जीवनात काही बदल घडवून आणायचे असतात. लोक तसा प्रयत्नही करतात. काही प्रमाणात बदल घडवतातही. पण ते बदल तात्पुरतेच असतात. पण मिनी हॅबिटस्च्या या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारे स्वतःच्या मनाविरुद्ध न जाता आपण जगातल्या या महान गोष्टी साध्य करू शकतो विशेष म्हणजे त्यासाठी स्वतःवर जबरदस्ती करण्याची अजिबात गरज नाही. मिनी हॅबिट ही एक अशी छोटीशी कृती आहे जी रोज करण्यासाठी तुम्ही स्वतःला सहज प्रवृत्त करू शकता. छोटी सवय ही बाबच अतिशय छोटीशी असल्यामुळे त्यात अपयश येण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आचरणात आणण्यासाठी साहजिकच हलकी-ङ्गुलकी पण अतिशय शक्तिशाली असते. म्हणूनच चांगल्या मिनी हॅबिटस् निर्माण करणे हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे. जो तुम्हाला या पुस्तकातून मिळेल.

3.फोकल पॉईंट (Focal Point) - 275
वेळ, पैसा, उत्पादकता आणि कार्यक्षमता दुप्पट करण्यासाठी ब्रायन ट्रेसी यांनी या पुस्तकातून काही मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. व्यक्तिगत व्यवस्थापनाच्या जगभरातील सर्वोत्तम कल्पना आणि योजनांचे एकत्रीकरण त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे. व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात असामान्य कामगिरी बजावलेल्या स्त्री-पुरुषांच्या सवयी या पुस्तकातून समजतात. कोणतेही काम करताना यश मिळवायचे असेल तर आपल्या संपूर्ण क्षमतेचा वापर करायला हवा, उत्पादकता दुपटीने वाढवायला हवे, असे ते सांगतात. त्यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली आहेत. व्यवसाय आणि करिअर, कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन, आर्थिक स्वातंत्र्य या महत्वाच्या विषयांवरही ते बोलतात. आरोग्य, आत्मशांती या मुद्यांकडेही लक्ष वेधतात.

View full details