Vichhoda By Harinder Sikka, Dr Shuchita Nandapurkar-Phadke(Translators) (विछोडा)
Vichhoda By Harinder Sikka, Dr Shuchita Nandapurkar-Phadke(Translators) (विछोडा)
Couldn't load pickup availability
वर्ष १९५०;
भारत आणि पाकिस्तानदरम्यान नेहरू-लियाकत करारावर सह्या झाल्या; त्यामुळं तिचं आयुष्य कायमचं बदलणार आहे, ती अधिक खंबीरसुद्धा होणार आहे, हे तिला ठाऊक नव्हतं;
१९४७च्या दंगलीत बिबी अमृत कौर हिचं आयुष्य अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालं. ती वेगळ्या नावाने, वेगळ्या ठिकाणी राहू लागली. नवं जीवन तिने मोठ्या डौलात स्वीकारलं, आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला. तिचं लग्न झालं, तिला दोन मुलं झाली; परंतु आयुष्यानं तिच्यासाठी काहीतरी वेगळंच योजलं होतं. त्यामुळे ती उद्ध्वस्त झाली... पुन्हा एकदा. या वेळेस वेदना असह्य होत्या. आपण आपल्या मुलांना पुन्हा भेटू आणि आपल्याला पूर्णत्व येईल, या आशेनेच काय ते तिला जिवंत ठेवलं होतं. कडवटपणापायी आपलं आयुष्य झाकोळून न देता ती आशा आणि धैर्याचा नंदादीप ठरली.
'कॉलिंग सेहमत' या उत्कृष्ट पुस्तकाच्या लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून धैर्य, त्याग आणि लवचीकता यांची, दडून राहिलेली आणखी एक कथा. वाचायलाच हवी अशी.
Share
