Skip to product information
1 of 2

Vicharvishwa By Vinayak Rajmane

Vicharvishwa By Vinayak Rajmane

Regular price Rs. 297.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 297.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

*विचारविश्व' हा प्रा. विनायक राजमाने सरांना विविध विषयांवर भाष्य करणारा एक सुंदर ग्रंथ आहे. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, पर्यावरणविषयक अशा अनेक विषयांवरील लेख, लेखकाने लीलया हाताळलेले दिसून येतात. ग्रंथातील ललित लेख, स्फुट, माहितीपूर्ण लेख तसेच महनीय  व्यक्तीचे चरित्रलेखन वाचत असताना भक्क व्हायला होते.

    छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शूर मावळ्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगावरील लेख वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात.  तर सुंदर पानगळीची सुंदर शिकवण, मला समजलेला देव, ऐसी अक्षरे रसिके. महाराष्ट्र देशा, नात्यांचा मेटेनन्स, कृतज्ञतेसाठी कृतज्ञता, सागरा प्राण तळमळला असे लालित्यपूर्ण शैलीतले लेख वाचताना भान हरमायला होते. 'विचारविश्व' चं वैशिष्टम हे, की यातल्या  प्रत्येक लेखात वाचक हरवून जातो. सरांच्या  आयुष्यातील काही रोमांचक , रंजक आठवणींनी समृद्ध असणारे माझी प्रिय शाळा, इच्छापूर्तनि आत्मिक समाधान, एका स्वप्नपूर्तीची कथा वाचताना हा अनुभव वाचकाला नक्की येतो.
      या ग्रंथातील सर्व लेखांचे निषय हे जितके वैविध्यपूर्ण आहेत, तितकेच ते अभ्यासपूर्ण आहेत. म्हणूनच त्यांचा लेखन स्तर हा खूप उच्च दर्जाचा दिसून येतो. यातील काही लेख हे वाचकांसाठी नक्की प्रेरणादायी  आहेत. सर्वच वयोगटातील वाचकांसाठी हा ग्रंभ एक मौल्यवान खजिना ठरु शकतो. वाचकांनी त्या खजिन्यातले हिरे - मोती शोधून, आपल्या समृद्धतेत भर घालणं एवढंच काम त्यांच्यासाठी बाकी राहतं.

*विचारविश्व' हा सरांचा पहिलाच ग्रंथ , मराठी साहित्यातील एक महत्वाचा ग्रंथ ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या पुढील लेखनकार्यात माझ्याकडून खूप शुभेच्छा...।।

View full details