Vector By Robin Cook, Dr. Pramod Joglekar(Translators)(व्हेक्टर)
Vector By Robin Cook, Dr. Pramod Joglekar(Translators)(व्हेक्टर)
अमेरिकेतील मॅनहटन भागातील एका गालिचा व्यापार्याचा, जेसनचा अचानक मृत्यू ओढवलाय... सोव्हिएत महासंघातल्या जैविक अस्त्र कारखान्यात काही काळ काम केलेल्या युरीनं जेसनला जैविक अस्त्राचं लक्ष्य केलंय... शवविच्छेदन करणारा जॅक स्टेपलटन जेसनच्या मृत्यूच्या कारणापर्यंत पोचलाय... जेसनवरचा प्रयोग यशस्वी झाल्याने युरी मोठ्या प्रमाणावर अॅन्थॅ्रक्स पावडरच्या निर्मितात मग्न आहे...आपल्या बायकोला, कोनीला यासंदर्भात काहीतरी संशय आलाय हे कळल्यावर युरीने तिला बोटुलिनम हे विष देऊन संपवलंय...कोनीचा मृत्यू आणि जेसनचा मृत्यू, यात काहीतरी धागादोरा आहे असं जॅकला वाटतंय....युरीच्या मदतीने कर्ट आणि स्टीव्ह (स्किनहेड या नाझी संघटनेशी संबंधित) दाट लोकवस्तीच्या भागात जैविक अस्त्राचा उपयोग करून लाखो अमेरिकनांचा जीव घेण्याच्या तयारीत आहेत...जेसन आणि कोनीच्या केसच्या माध्यमातून जॅक सत्यापर्यंत पोचू पाहतोय...पोचतो का तो सत्यापर्यंत? युरी, कर्ट आणि स्टीव्ह आपल्या योजनेत यशस्वी होतात का?