Varkari Vaishnav Sampraday By Dinkarshastri Bhukele
Varkari Vaishnav Sampraday By Dinkarshastri Bhukele
‘वारकरी वैष्णव संप्रदाय’ हे पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे, तेराव्या शतकात मनुस्मृती आधारे पूर्वापार चालत आलेल्या स्मार्त सनातन धर्माकडून उपेक्षित उपयनास अपात्र स्त्री शूद्रातिशूद्र बहुजनांसहित सकळजनांच्या कल्याणासाठी संतांनी वारकरी संप्रदाय व संत वाङ्मयाच्या माध्यमाने सकळांना समान अधिकार असलेला भागवद्धर्मीय वैष्णव कुळाचा कूळ धर्म सांगितला. म्हणजेच सरळ सोपा श्रीविठ्ठल भक्तीचा मार्गदाखविला व कलियुगात परिणामशून्य केवळ धनाचे साकडे असलेल्या, स्मार्त सकाम कर्मकांडाची निरर्थकता समाजाला स्पष्ट करून सांगितली. नवस सायास, बलिप्रथा, जादूटोणा अशा कुप्रथा नाकारून, वर्ण व जातीचा अभिमान विसरून, सर्व जाती-धर्माच्या आबालवृद्ध स्त्री-पुरुषांना पंढरीचे वारकरी म्हणून पंढरपूरक्षेत्री, चंद्रभागेच्या वाळवंटात परमार्थ साध्य करण्यासाठी एकत्र केले. वारकरी संतांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून, शरीर व प्राणाची चिंता न करता, धर्ममार्तंडांच्या विरोधांना व अत्याचारांना न जुमानता, पारवाड खंडन करून, वेगळा परमार्थ सांगून समाजाला जागविले. अशा संतांचा मार्ग म्हणजेच ‘वारकरी संप्रदाय’ होय. तो यथाशक्य शिक्षकांच्या माध्यमाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात चरित्र व चरित्रातील चमत्कारांवर भर न देता, संतांचा वारकरी संप्रदाय व वारकरी संप्रदायाची आचार-विचारांची परंपरा व सकळांच्या आत्मोद्धार कार्याचाच विचार केला आहे, जो शालेय मूल्य शिक्षणासाठी पूरक आहे.