Varaha ShreeVishnucha Tisara Avatar By Dr. Lata Aklujkar (वराह श्रीविष्णूचा तिसरा अवतार)
Varaha ShreeVishnucha Tisara Avatar By Dr. Lata Aklujkar (वराह श्रीविष्णूचा तिसरा अवतार)
वराह श्रीविष्णूचा तिसरा अवतार या पुस्तकात श्रीविष्णूच्या वराह या तिसऱ्या अवताराची समग्र माहिती लेखिका डॉ. लता अकलूजकर यांनी दिलेली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अवतार या संकल्पनेस फार महत्त्वाचे स्थान आहे. तसेच श्रीविष्णूच्या दशावतारासही फार मोठे महत्त्व आहे. जगाच्या कल्याणासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी श्रीविष्णूनी वारंवार वेगवेगळे अवतार धारण केले होते. त्यामधील वराह हा त्यांचा तिसरा अवतार आहे. पृथ्वीच राहिली नाही तर जीवन कसे राहणार? म्हणूनच पृथ्वीला आपल्या अन्याय अत्याचाराने समुद्राच्या तळाशी घेऊन गेलेल्या हिरण्याक्ष या राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीविष्णूंनी वराह अवतार धारण केलेला होता. या वराह अवताराची आजही जनमानसामध्ये एवढी धार्मिक प्रेरणा जागृत आहे की या अवताराची भारतभर मंदिरे पसरलेली दिसतात. अशा मंदिरांचा आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने या पुस्तकाचे महत्व निर्विवादपणे मोठे आहे.