Vapu Sange Vadilanchi Kirti By V.P.Kale (वपु सांगे वडिलांची कीर्ती)
Vapu Sange Vadilanchi Kirti By V.P.Kale (वपु सांगे वडिलांची कीर्ती)
Couldn't load pickup availability
व.पु. काळे हे महाराष्ट्राला एक कथालेखक आणि कथाकथनकार म्हणून सुपरिचित आहेत. व.पु.ंचे वडील पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचं रूढ अर्थाने चरित्र म्हणता येईल अशा पद्धतीने वपुंनी चरित्र लिहिलं नसलं तरी वडिलांना केंद्रस्थानी ठेवून अंत:करणपूर्वक लिहिलेलं पुस्तक आहे, ’वपु सांगे वडिलांची कीर्ती.’ वपुंचे वडील उत्कृष्ट नेपथ्यकार होते. नाटक आणि चित्रपटांसाठी पडदे रंगवणं हे त्यांचं काम. वपुंची आई (वपु आणि त्यांची बहीण आईला ताई म्हणत), त्यांची मोठी बहीण सिंधूताई आणि वपु स्वत: असं हे चौकोनी कुटुंब. वपु आणि सिंधूताई वडिलांना ’अण्णा’ असं संबोधत. अण्णा मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल कलामंदिरमध्ये नोकरी करत. मुंबईला मित्राच्या घरी ते राहत. कुटुंब मात्र पुण्याला होतं. महिन्या दोन महिन्यांनी दोन दिवस रजा घेऊन किंवा एखाद्या शनिवार-रविवारी ते पुण्याला येत. त्यावेळेला वपु आणि त्यांची बहीण शाळकरी वयात होते. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईच्या एका चाळीत घर घेतलं आणि वपु, सिंधूताई व ताई मुंबईला रवाना झाले.
Share
