Skip to product information
1 of 1

Vaman Chorghade Yanchya Nivdak Katha Bhag - 1 By Vaman Chorghade (वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग -१)

Vaman Chorghade Yanchya Nivdak Katha Bhag - 1 By Vaman Chorghade (वामन चोरघडे यांच्या निवडक कथा भाग -१)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

नवकथापूर्वकाळात प्रवाही निवेदनशैली आणि कथनवस्तूच्या दमदारपणामुळे कथावाङ्मयाला नवे वळण देणाऱ्या कथाकारांपैकी एक महत्त्वाचे कथाकार म्हणजेच वामन कृष्ण चोरघडे. १६ जुलै, २०१४ रोजी त्यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांच्याच निवडक अशा लघुकथांचा हा संग्रह होय.

"वामनरावांच्या कथेने सुरुवातीपासूनच वेगळे वळण घेतले. कुठल्याही कथालेखकाच्या किंवा तंत्राचा बडेजाव कधी केला नाही. स्वतःच्या समृद्ध अनुभूतीतून त्यांना जे जाणवले ते त्यांनी उत्कटतेने लिहिले, सहजतेने लिहिले. या सहजतेत त्यांचे भावजीवन मिसळले गेले म्हणूनच वामनरावांच्या कथेने एक स्वतंत्र, निराळा आकार घेतला. घटना, चमत्कृतीच्या बंधनातून त्यांनी कथेला मुक्त केले, तिला अंतर्मुख बनविले आणि नवी काव्यात्मशैली तिला प्राप्त करून दिली. १९३२ साली 'अम्मा' ही पहिली कथा लिहिली. त्या कथेपासून ते 'बेला' या गेल्यावर्षीच्या त्यांच्या कथासंग्रहातील कथांपर्यंत वामनरावांनी स्वतःचे असे निराळेपण टिकवून ठेवले आहे. या दीर्घकाळात कथाकारांच्या दोन पिढ्या होऊन गेल्या; पण चोरघड्यांची कथा या सर्व काळातून चिरतरुण व चिररुचिर राहिली आहे. तिच्यातील टवटवीतपणा आजही आपले मन आकृष्ट करीत आहे."
- श्री. म. ना. अदवंत

View full details