Vaktrutva Kala Ani Sadhana By Prabodhankar Thackeray (वक्तृत्व कला आणि साधना)
Vaktrutva Kala Ani Sadhana By Prabodhankar Thackeray (वक्तृत्व कला आणि साधना)
अनेक नामांकित देशी-परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीडी होती. कित्येकांची तर ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी, काही केवळ विद्वनेच्या प्रदर्शनासाठी बोलत. त्यांची व्याख्याने श्रोते पुराणिकाच्या ठराविक घाटणीसारखी फक्त मक्तिभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुसन्या कानाने बाहेर सोडीत, कसं काय झाल व्याख्यान? तर वक्ता विज्ञान, विलक्षण अभ्यासू, आपल्याला काय समजणार त्यात, हा परिणाम, कित्येकांची भाषणे मधुरमपुर शब्दांचा नुसता सहा श्रोत्यांनी तो नुसता ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे, कित्येकांची भाषणापेक्षा हातवारेच जबरदस्त, असले नाना प्रकार पाहून वक्तृत्य-परिणामकारक वक्तृत्व असावे कसे आणि ते कमावण्यासाठी उमेदवारांनी स्वाध्यायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव नि मुद्राभिनयाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुदद्यांची मी चार-पाच वर्षे टिपणे करीत होतो, आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासित होतो.