Vaintey - वैनतेय | By V. S. Khandekar
Vaintey - वैनतेय | By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
वि. स. खांडेकर यांनी ते ‘वैनतेय’ साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातील अग्रलेखांचा आणि ‘परिचयाची परडी’ या सदरातील लेखनाचा प्रस्तुत ‘वैनतेय’ या ग्रंथात अंतर्भाव केला आहे. अग्रलेखांमधून खांडेकरांनी शिक्षण, राष्ट्रीयता, अस्पृश्यता, न्याय, धर्म, संस्कृती, इतिहास, राजकारण, सहकार, अर्थशास्त्र, संप, संघटन, व्याQक्तगौरव, साहित्य, भाषा असा गोफ विणत `संपादक` म्हणून आपला व्यासंग सिद्ध केला आहे. खांडेकर अग्रलेखांत आपलं नुसतं मत नोंदवून थांबत नाहीत, तर समस्या-विमोचनाचे उपाय सुचवत, ते आपलं वृत्तपत्रीय उत्तरदायित्वही निभावतात. ज्याला पुस्तकपरिचय, परीक्षण, टीका, समीक्षा म्हणता येईल, अशी दोन सदरं वि. स. खांडेकरांनी `वैनतेय` साप्ताहिकात लिहिल्याचं दिसून येतं. पैंकी एक होतं `परिचयाची परडी.` या सदरात खांडेकरांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल विस्ताराने व मनस्वीपणे लिहिलं आहे.