Vachansanskruti By Nagnath Kottapalle (वाचनसंस्कृती)
Vachansanskruti By Nagnath Kottapalle (वाचनसंस्कृती)
Couldn't load pickup availability
'वाचनसंस्कृती' ही संज्ञा वापरत असताना संपूर्ण साहित्यव्यवहार किंवा ग्रंथव्यवहार आपल्या डोळ्यांपुढे असतो. लेखकापासून सुरू होणारी ही प्रक्रिया वाचकापर्यंत येताना प्रकाशक, मुद्रक, संपादक, ग्रंथ वितरक, मुद्रितशोधक, चित्रकार इत्यादी अनेक घटकांना स्पर्श करीत विकसित होत जाते. प्रक्रियेचा आढावा घेण्याचा प्रयास म्हणजे 'वाचनसंस्कृती' हे पुस्तक. या सर्व मध्ययुगापासून आधुनिक कालखंडापर्यंत या प्रक्रियेचे स्वरूप अनेक अंगांनी बदलत गेले. पूर्वी ‘श्रोता’ असणारा बहुसंख्य वर्ग हळूहळू वाचक बनत गेला. या बदलांना तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांची जशी पार्श्वभूमी होती तसाच त्यांना सामाजिक- वैचारिक स्थित्यंतराचा मोठा आयामही होता. बदलांची ही प्रक्रिया आजही चालूच आहे कारण तंत्र सातत्याने विकसित होत आहेच, परंतु त्याबरोबर सामाजिक स्थित्यंतरेही वेगवेगळ्या स्वरूपात या वाचनसंस्कृतीवर बरे वाईट परिणाम करत आहेत. इतिहास, सामाजिक चळवळी, वैचारिक स्थित्यंतरे, राजकारण आणि शासकीय धोरणे, शैक्षणिक बदल, भौतिक बदल, बदललेला सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवेश या सर्व घटकांच्या वाचनसंस्कृतीवर होत असणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांचा परामर्ष हे पुस्तक घेते आणि त्याचबरोबर भविष्यकालीन अनेक शक्यतांचे संसूचनही करते. मराठी भाषा आणि संस्कृती, वाचनसंस्कृती आणि एकूणच ग्रंथव्यवहार यांच्याशी आपले जैविक नाते आहे, असे वाटणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे.