Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
' डॉ. प्रियदर्शिनी कर्वे! एक तरुण शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती, अन् पुष्कळ काही. ही आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पणती. म्हणजेच ‘दिनकर-इरावती’ या कर्वे दांपत्याच्या – जाई निंबकर, गौरी देशपांडे, डॉ. आनंद कर्वे या – तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी. म्हणजेच इरावतीबाईंच्या ‘परिपूर्ती’मधल्या ‘नंदू कर्व्या’ची मुलगी. हिनं ‘पर्यावरणा’चा ‘वर्ल्ड टेक्नॉलजी नेटवर्क’चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. (या आधी वेगवेगळ्या क्षेत्रांत हा पुरस्कार मिळवलेल्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत - ‘हिज एक्सलन्सी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम!’) ही जिथे प्रकल्प समन्वयक आहे, त्या ‘आरती’ संस्थेनं अत्यंत प्रतिष्ठेचा जागतिक ‘ॲशडेन पुरस्कार’ दोन वेळा मिळवला आहे. समाजासाठी धडपडण्याचा ‘वेडा ध्यास’ हिनं वारसाहक्कानं मिळवला आहे. हिची थक्क करणारी आत्तापर्यंतची वाटचाल अन् क्षमता बघता एकच ओळ मनात येते – ‘किनारा तुला पामराला!’
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books