Unf*ck Yourself (Marathi) By Gary John Bishop, Sunanda Amrapurkar (अनफ्*क युअरसेल्फ (मराठी)
Unf*ck Yourself (Marathi) By Gary John Bishop, Sunanda Amrapurkar (अनफ्*क युअरसेल्फ (मराठी)
Couldn't load pickup availability
चाकोरीत अडकला आहात? संशयाने पछाडले आहात? कंटाळवाणे वाटत आहे? ‘अनफ*क युअरसेल्फ’ या पुस्तकातून आपली चराचर सृष्टी जणू तुम्हाला चपराक देऊन भानावर आणते आणि सांगते की, तुमच्यातल्या खर्या सामर्थ्यानिशी डौलदारपणे आयुष्यात परत या.
आपल्या अंतर्मनातल्या टीकाकारावर नियंत्रण कसं मिळवायचं आणि काहीतरी भव्यदिव्य करून दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची हे लोकप्रिय लेखक आणि लाइफ कोच गॅरी जॉन बिशप आपल्याला प्रस्तुत पुस्तकातून दाखवून देतात.
तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असोत. काहीतरी चमत्कार घडून वाट पाहण्यात वेळ व्यर्थ घालवणे थांबवा; कारण जादू किंवा चमत्कार होणार नाहीत. आता आहे त्याहून आनंदाचं आणि समाधानाचं आयुष्य तुम्हाला मिळण्यामधला एकमेव अडथळा तुम्ही स्वत: आहात.
वायफळ विचारातून बाहेर पडून तुमच्यातल्या महानतेला बंधमुक्त करण्याची हीच वेळ आहे. “सेल्फ-हेल्प प्रकारच्या पुस्तकांच्या दुनियेत वादळ उठवणार्या; थेट मुद्द्याला हात घालणार्या ग्लासगो, स्कॉटलंडच्या गॅरी जॉन बिशप यांना या पुस्तकातून भेटा.” – संडे हेराल्ड
Share
