(Umberkhind + Jiretop + Gadkille Maharashtrache + Hambirrao Mohite + Suratechi Loot Ki Swarajyachi Bharapai ?) - Historical book Set
(Umberkhind + Jiretop + Gadkille Maharashtrache + Hambirrao Mohite + Suratechi Loot Ki Swarajyachi Bharapai ?) - Historical book Set
Couldn't load pickup availability
# विशेष ऑफर, विशेष सवलत ! # ऐतिहासिक पुस्तकांची सुंदर मेजवानी
३ पुस्तक विकत घ्या! २ आम्ही मोफत देऊ! टीप - ऑफर कालावधी मर्यादित| तिन्ही पुस्तकांची अतिशय सुंदर छपाई केली आहे .
उंबरखिंड+ सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई + महाराष्ट्रातील गड-किल्ले
तिन्ही पुस्तके किंमत ₹ १०९९/-| कोणतेही कुरियर खर्च नाही | टोटल किंमत = १०९९/-
( ₹ २५०/- चे जिरेटोप आणि ₹ १२०/- हंबीरराव मोहिते ही दोन गाजलेली पुस्तके आपणास भेट देण्यात येणार आहे)
अधिक माहितीसाठी किंवा फोनवर ऑर्डर करण्यासाठी : 9075496977/ 8975930258
वेबसाईट वर ऑर्डर करण्यासाठी :
पुस्तकविश्व अँप वरती ऑर्डर करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.pustakvishva.app
१. उंबरखिंड - पाने २१९! मूल्य - ₹ ३५०/-
(अतिशय सुंदर छपाई केली आहे)
शाहिस्तेखान पुण्यात होता त्या काळाची ही गोष्ट.
शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना , लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने स्वराज्याला अजगरी वेढा घातला. या शाहिस्तेखानाला धडा शिकवायचा असेल तर आधी त्याचा उजवा हात मुळासकट उखडून टाकायला हवा, या विचाराने शिवाजीराजांनीं रचला सर्वात भयाण गनिमी कावा. मुघली इतिहासातील तो कला दिवस. एक हजार मराठ्यांनी तीस हजार मुघलांना उंबरखिंडीत चारी बाजूंनी वेढा घालून निबर फोडले. तेच हे युद्ध, त्याच डावाची ही कथा. माती गुंग करणारा गनिमी कावा.
इतिहासातील सर्वांत मोठा गनिमी कावा #उंबरखिंड
२. सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ( सुंदर छपाई )
सुरत हे मुघल साम्राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र होते. त्यातही तेथील मुलकी व लष्करी प्रशासन स्वतः मुघल बादशहाच्या नियंत्रणाखाली होते. त्यामुळे सुरतेवरील हल्ल्याचा फटका केवळ आर्थिक नव्हे तर एकूण मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला शिवछत्रपतींनी दिलेला जबरदस्त धक्का होता. इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट ऑक्झिडेंन १९ मार्च १६६४ च्या पत्रात म्हणतो,
"त्याचा (शिवाजी महाराजांचा) उद्देश केवळ संपत्ती मिळविणे नसून बादशाहावर सूड उगविणे हा होता."
३. महाराष्ट्रातील गड-किल्ले - पाने २००! मूल्य - ₹ २५०/-
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले डोंगरी किल्ले, जलदुर्ग आणि भुईकोट अशा तब्बल पन्नास महत्त्वाच्या किल्ल्यांचा रंजक, वाचनीय भाषेत घेतलेला माहितीपूर्ण धांडोळा म्हणजे 'महाराष्ट्रातील गड-किल्ले'.
४. जिरेटोप - पाने (१६०) ! मूल्य - ₹ २५०/-
जळालेल्या गोष्टींचा विझवलेला इतिहास,तुमच्या समोर विस्तवासारखा पुन्हा उभा राहतोय!
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन केले. त्यासाठी त्यांनी ३५७/३६० किल्ले बांधले. संभाजी महाराजांनी त्यात भर घातली. औरंगजेबाचे पस्तीस लाख सैन्य अंगावर घेऊन लढा देत असताना सौराष्ट्रपासून पाँडेचरीपर्यंत दीडशे किल्ले स्वराज्यात सामील केले. बरेच नवीन बांधले आणि ५०७ किल्ल्यांचे साम्राज्य उभे केले जे जागतिक रेकॉर्ड ठरले गेले. जे जगामध्ये आजतागायत कोणी मोडू शकले नाहीत. स्वराज्याच्या सुराज्यातून सोन्याचा धूर निघू लागला आणि घात झाला !
५. शिवरायांचे एकनिष्ठ मावळे - हंबीरराव मोहीते पाने (८०) ! मूल्य - ₹ १२०/-
हंबीरराव मोहिते म्हटले की , डोळ्यासमोर येतो एक रांगडा मराठा गडी! उंच देहयष्टी ,चेह-यावर राकट व करारीपणा , गालावर मोठ्या मिशा असलेले मर्दगडी ,डोक्यावर सरसेनापती पदाचा मुकुट, गळ्यात मोत्यांच्या माळा व हाती दुधारी तलवार असलेले एक रुबाबदार व्यक्तीमत्व होय.!
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभू महाराजांच्या काळात आपल्या अमोघ कार्याचा ठसा उमटवणारे हंबीरराव मोहिते हे एक विलक्षण व्यक्तीमत्व होते. 'मोडेल पण वाकणार नाही' या वृत्तीचे तसेच आपल्या तत्वांशी कधीही प्रतारणा न करणारे हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू रणांगणावर शत्रूशी लढताना झाला. आपल्या मृत्यूआधिही मुघलांना धूळ चारत त्यांनी विजयश्री संपादन करुन हिंदवी स्वराज्याला शेवटचा मुजरा केला.
Share
