Ulka | उल्का By V. S. Khandekar
Ulka | उल्का By V. S. Khandekar
Couldn't load pickup availability
१९३४ मधील उल्केची तेजस्वी कहाणी...आजच्या सत्वहीन समाजमनाला जाग आणणारी...
तत्त्वनिष्ठ आणि तत्त्वशून्य माणसांमधील संघर्ष याचे चित्रण साहित्यामध्ये फार जुन्या काळापासून होत आहे. यात बदलत काय असतील, तर ती तत्त्वं. ‘उल्का' या कादंबरीमधील तत्त्वांच्या संघर्षाची पाश्र्वभूमी विसाव्या शतकातील पूर्वार्धातील आहे. पुनर्विवाह केलेल्या तत्त्वनिष्ठ भाऊसाहेबांची कन्या- तारा, जन्मापासून बंडखोर असते. तीच भाऊसाहेबांची उल्का. समाजाने या गरीब शिक्षकाला आपल्यापासून दूर सारलेले असते. मोठी होताना उल्का, आत्याबाई, माणिकराव, इंदू, बाबूराव अशांच्याद्वारे माणसं जगताना कशी लबाडी करतात, काय तडजोडी करतात, कसे एकमेकांचे पाय ओढतात, हे तर ती बघतेच; पण त्याबरोबर तिला भाऊसाहेब आणि चंद्रकांत अशांच्या वागण्यातून प्रखर तत्त्वनिष्ठता पाहायला मिळते.