Tukobanche 51 Preranadayi Sutre! By Navnath Jagtap (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे लेखक - नवनाथ जगताप)
Tukobanche 51 Preranadayi Sutre! By Navnath Jagtap (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे लेखक - नवनाथ जगताप)
Couldn't load pickup availability
तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप
पाने - ३५२
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.
हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.
Share
