Tisara Punch By Sabby Pereira (तिसरा पंच)
Tisara Punch By Sabby Pereira (तिसरा पंच)
Couldn't load pickup availability
सॅबीचा विनोद त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच नेमस्त, सरळमार्गी आणि मध्यमवर्गीय जनतेसारखा सोशिक व समजूतदार विनोद आहे. ते साधा सरळ नेहमीचा आरसाच समाजापुढे धरतात. फक्त त्या आरशात त्यांना असा काही वेगळा कोन सापडलेला असतो की त्यात आपलं, आपल्या समाजाचं, आपल्या धारणांचं त्यातलं यथातथ्य प्रतिबिंब पाहूनही वाचक क्षणभर विचारात पडतो, कधी मोठ्यानं, तर कधी स्वतःशीच हसतो. मग लेखकाला नकळत दाद देतो. या माणसाचा शालजोडीचा होलसेल ठेका असावा, इतका शालजोडीतून ठोसे देण्याच्या कलेत तो पारंगत आहे. कुणाला तरी थोबडून काढण्याच्या आविर्भावातला आक्रमक, हिंस्र विनोद हा सॅबींचा पिंड नाही. त्यांचं जन्मगाव वसई, कर्मभूमी मुंबई, त्यामुळे मुळामुठेच्या पाण्याचा संस्कार नाही, साहजिकच टोमणेबाज कुत्सितपणापासूनही सॅबींचा विनोद वंचित आहे. समाजातला किंवा अगदी स्वत:मधलाही दंभ पाहिल्यावर एखाद्या अस्सल विनोदकाराच्या मनात फुटणारी उकळी सॅबीच्याही मनात फुटतेच. फक्त ती उकळी तो निवू देतो, त्यावर साय धरू देतो आणि मग तीच मलई मारून गरमागरम विनोदाचा असा चहा हातात देतो की त्याची गोडी लुभावते, मलई जिव्हा तृप्त करते आणि चहाचा माफक चटका मेंदूला तरतरीतही करतो. - मुकेश माचकर
Share
