1
/
of
1
Tipkagad By Dr. Rajan Dhondiram Padval (टिपकागद)
Tipkagad By Dr. Rajan Dhondiram Padval (टिपकागद)
Regular price
Rs. 212.00
Regular price
Rs. 249.00
Sale price
Rs. 212.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे त्या टिपण्यातून वाढत जाते. फक्त आपण त्याकडे डोळसपणे कसे पाहायला हवे याबद्दलचे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात.
Share
Reviews
4 reviews
5
4
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
Recent
10
02/09/2025
वब
विजय बामणे
हे पुस्तक म्हणजे व्यवस्थापन शास्त्राच्या प्रोफेसरन नी आपल्या मनात घातलेला मुक्त संवाद च जणू.
पुस्तक बऱ्याच दृष्टीने उल्लेखनीय आहे.अशा प्रकारची ब्व्यक्ती मत्व विकासावर पुस्तके इंग्रजी मध्ये खूप आहेत.
मराठी त मोजकीच पुस्तके असावीत.
पूर्ण पुस्तक वाचनीय आहे पण ताज हॉटेलवर झालेला हल्ला , मुंबईच्या दबेवाल्यावर लिहिलेले प्रकरण विशेष वाचनीय आहेत.
पुस्तक वाचून संपल्यावर एक चांगले पुस्तक वाचल्याचा आनंद मिळतोच पण लेखकाकडून आपल्या अपेक्षा वाढतात. डॉ.पडवळ येणाऱ्या काळात पण अशीच सकस निर्मिती करतील अशी खात्री आहे.
See more02/08/2025
दआ
दत्ता आपटे
"टीपकागद" अक्षरशः एका बैठकीत वाचून संपवलं.बरेच दिवसांनी हा योग आला.हे स्फुट लेखन कि ललित वगैरे टीकाकारांना पडणारे प्रश्न.मला वैयक्तिक रित्या हे मस्त वाटलं.कुठलाही लेख उघडून वाचायला सुरुवात करावी असं. हे 'राजनजींचे' अनुभव पण हे टीप कागदावरचे डाग मनात राहतात.लहानपणी टीपकागद ही एकतर्हेची चैन होती.मित्राचे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांना त्याकाळी भेट म्हणून औषध कंपन्या त्यांची जाहिरात एका बाजूला छापलेले ब्लॉटिंग पेपर मिळायचे.माझा मित्र त्यातलाच एखादा मला द्यायचा.तो टीप कागद मग वर्षे दोन वर्षे जपून वापरायचा. त्यावेळी फौंटनपेनची शाई सांडणे आणि टीप कागद हे समीकरणच होतं.त्या टीप कागदावर जागा शिल्लक नाही अशी खात्री पटेपर्यंत त्याचा वापर व्हायचा.असो.
पण आजकालच्या जाहिरात युगात म्हणतात तसे "दाग अच्छे है" असं हे टीप कागदावरचं लेखन आहे.फारच सुंदर "When you write more and more personal it becomes more and more universal" असं एक इंग्रजी quote आहे तसं हे लेखन.अनुभव राजनजींचे असले तरी आपणही यातील काही अनुभवातून गेलेलो आठवत राहतं.मात्र त्यातून लेखकाने केलेली उकल आणि मार्गदर्शन अप्रतिम.
दत्ता आपटे, कोल्हापूर.
See more02/08/2025
नज
नितीन जोशी
खरंच लेखकाने आपल्या संपन्न अनुभवाचा पेटाराच सर्वांपुढे खुला केला आहे.
त्यांनी बोलता बोलता भीतीच रूपांतर सहसा मध्ये, हेव्याच रूपांतर प्रेरणेमध्ये, रागाचे रूपांतर सहनशीलते मध्ये व द्वेषाचे रूपांतर प्रेमात कसं करता येऊ शकत हे खूप सहज सुंदर पद्धतीने सांगितले आहे हे खूपच आवडले.
प्रत्येक प्रकरणांच्या अखेरीस आपण उद्धृत केलेले 'quotes' are like cherry on a cake.
जगणाऱ्या प्रत्येकास रोज नवनवे अनुभव येतच असतात पण ते चपखल शब्दात मांडण्याची कला खूप कमी जणांकडे असते. ती नस लेखकाने अचूक पकडली आहे.
त्यामुळेच हे पुस्तक खूप वाचनीय आहे.
See more02/08/2025
U
Ujwala
Excellent book in the category of self help books.