Skip to product information
1 of 3

Ajichya Goshti+Tingal Tavali + Gotya Diwali Ank 2024 (आजीच्या गोष्टी+टिंगल टवाळी+गोट्या दिवाळीअंक 2024)

Ajichya Goshti+Tingal Tavali + Gotya Diwali Ank 2024 (आजीच्या गोष्टी+टिंगल टवाळी+गोट्या दिवाळीअंक 2024)

Regular price Rs. 558.00
Regular price Rs. 620.00 Sale price Rs. 558.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

# आजीच्या गोष्टी # 
'आजीच्या गोष्टी' हा विशेषांक लहानांबरोबर मोठ्यांनाही वाचण्यासारखा आणि वाचल्यावर आवडेल असाच आहे. नातवंडांना विशेषतः आजी आजोबांनी गोष्टी सांगितलेल्या आवडतात. झोपताना नातवंडांना गोष्टी ऐकायच्याच असतात. त्यांना गोष्टी ऐकून खूप आनंद होतो, छान झोप येते आणि आजी आजोबांनाही खूप समाधान वाटते. म्हणूनच नातवंडांना गोष्टी सांगण्यासाठी आजी आजोबांना 'आजीच्या गोष्टी' हा अंक वाचला की उपयोगी पडेल आणि पालकांनीही तो जरुर वाचावा. कारण त्यांच्यावर सुध्दा कधीतरी गोष्ट सांगण्याची वेळ ही येतेच. 

#  गोट्या #
 गोट्या २०२४ च्या दिवाळी विशेषांकात आहे मनोरंजनाचा, बालसाहित्याचा खजिना आणि ज्ञानाचे भांडार.
बालमित्र मैत्रिणींनो, तुमच्यासाठी खोडकर 'गोट्या' आलाय. त्याने केलेल्या करामती वाचून तुम्हांला नक्कीच हसू येईल. गोट्या वाचून तुमच्या ज्ञानात तसेच मनोरंजनात भर पडेल. तुमची भरपूर करमणूक होईल. छोटू सारखाच गोट्याने सुद्धा तुमच्या घरात, साहित्य विश्वात मानाचे स्थान पटकावले आहे. तर बालमित्र, मैत्रिणींनो दरवर्षीप्रमाणे गोट्याचे स्वागत तुम्ही नक्की कराल..
प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच हा अंक आहे. बाल साहित्याच्या कोंदणात नक्कीच दरवर्षी हिऱ्याप्रमाणे तेजस्वी चमकेल हा गोट्या ! या गोट्याशी दरवर्षीच मैत्री करा. सगळा गोट्या वाचा आणि तुमच्या बाल साहित्य खजिन्यात त्याला मानाचे स्थान द्या. आपल्या अभिप्रायाचे स्वागतच होईल !

# टिंगलटवाळी # 
टिंगलटवाळी हे माझे लहानपणीच्या विविध आठवणींचे सत्यकथन आहे. मी अशोक दगडू टिकेकर लहानपणी खूप वात्रट, दंगा करणारा, निर्भय, हट्टी, नाविन्याची आवड असलेला, स्वतःचंच खरं करणारा तरीही आख्ख्या कुटुंबाचा आणि गावाचा लाडका होतो.
बऱ्याचदा आमची रवानगी कधी सुट्टीत, कधी लग्नानिमित्त तर कधी शिक्षणासाठी म्हणून कालेकरवाडी, टिकेकरवाडी आणि पिंपळवंडी येथे होत असे. मुख्यत्वे पिंपळवंडीतच माझे लहानपण गेले. त्यावेळचे प्रसंग एकदम डॅशिंग असले तरी हसू आणि आसू आणणारे आहेत. अनेक विनोद व खोड्या घडत गेल्या. म्हणून ही माझी 'टिंगलटवाळी' गोष्टीरुपाने या १ पुस्तकात देता आली आहे. तुमची चांगलीच करमणूक होईल हे पुस्तक

View full details