Time And Self Management| Tumche Netrutva Tumchya Hati | Tumchyatil Shakti Olkha| Informative combo book set
Time And Self Management| Tumche Netrutva Tumchya Hati | Tumchyatil Shakti Olkha| Informative combo book set
Couldn't load pickup availability
1) Time And Self Management | टाइम अॅण्ड सेल्फ मॅनेजमेंट - 350/-जन्म आणि मृत्यू यांच्यात लंबकासारखा फिरणारा वेळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य. या वेळेची सूत्रे ज्याला हाती ठेवता आली, त्याला आयुष्य सुखा-समाधानानं जगता आलं. अनेकांना ही उपरती होते वेळ निघून गेल्यानंतर. यासाठी वेळ व आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. यासाठी –
. घड्याळाचे कुसंस्कार कसे पुसावेत?
. स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय?
. वेळेचे गणित तंत्रं व मंत्र कोणती?
. स्त्री व पुरुषाचे वेळ व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल.
कांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
राजेश मंडलिक सीईओ व एमडी सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा.लि.
2) Tumche Netrutva Tumchya Hati | तुमचे नेतृत्व तुमच्या हाती- 150/-
समुद्राच्या तळाशी खोलवर जाणाऱ्या पाणबुड्यासाठी ऑक्सिजनचे जितके महत्त्व असते तितकेच नेत्यासाठी विकासाचे महत्त्व असते. ऑक्सिजनच्या अभावी जसा पाणबुड्या मरण पावतो तसे तुम्ही विकासाअभावी शारीरिक पातळीवर मृत्यू पावणार नाही;
पण तुमचा प्रभाव नष्ट होईल आणि कालांतराने तुम्ही नेतृत्व करण्याची संधीही गमावून बसाल.
दुर्दैव म्हणजे नेतृत्वाचा असा घात मोठ्या तसेच लहान संघटनांमध्येही दिसून येतो मग ती संघटना नफा वा विना-नफा तत्त्वावर चालणारी असो. जे नेते नेतृत्वाचे पद प्राप्त करतात ते पद टिकवून ठेवण्यात अपयशी ठरतात किंवा काहीजण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे वरच्या पदावर जातात खरे; पण त्या गुणांना कधीच वाव मिळत नाही.
तरुण उदयोन्मुख नेते ज्यांना झळकण्याची संधीच मिळत नाही त्यांच्याबाबतही हेच दिसते.
त्यांचे सुप्त गुण सुप्तावस्थेतच राहतात. या सगळ्या बाबींमध्ये एक समान तत्त्व काय आहे? वैयक्तिक विकास किंवा त्याचा अभाव.
विकसित होण्यात अपयशी ठरल्यानेच अनेकांच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीचा दुर्दैवी अंत होतो.
आम्ही प्रार्थना करतो की, विकसित होण्याच्या तुमच्या उत्कट इच्छेला हे पुस्तक इंधन पुरवील.
तुम्हाला पटवून देईल की, तुम्ही विकसित होऊ शकता, कसे विकसित व्हावे हे ही तुम्हाला दाखवून देईल आणि तुम्हाला आयुष्यभर विकसित होण्याचे बळ देईल.
तुम्ही विकसित होता होता मजा करा!
– केन ब्लँचर्ड आणि मार्क मिलर
3) Tumchyatil Shakti Olkha | तुमच्यातील शक्ती ओळखा - 225/-
लुईस हे तुमच्या अंतर्मनाला साद घालतात – जिथून सगळ्या सुधारणांची सुरुवात होते. मला हे पुस्तक खूप आवडले… आणि मी लुईस हेच्या प्रेमात पडलो आहे…
– डॉ. वेन डायर
विश्वविख्यात मार्गदर्शक लुईस एल. हे यांनी आजपर्यंत भीती, तणाव आणि अपराधभावाच्या दुष्टचक्रात अडकून स्वत:चे आयुष्य मर्यादित करून घेतलेल्या लाखो लोकांना मुक्त होण्यासाठी मदतीचा हात दिला. ‘यू कॅन हील युअर लाइफ’ या बेस्टसेलर पुस्तकातील अनेक कल्पनांना प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने आकार दिला असून भावनिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता कशी विकसित करावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आपले पालक, जोडीदार किंवा सहकारी, आपल्या नातेसंबंधातले लोक नेहमी टीका करून आपल्याला बदलवण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आतपर्यंत रुजलेली नकारात्मक मानसिकता तयार होते.
लुईस आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी प्रेरित करतात –
• आपण काय करत नाही, ऐवजी – आपण काय करतो.
• आपल्याला काय माहिती नाही, ऐवजी – आपल्याला काय माहिती आहे.
• आपण काय नाहीत, ऐवजी – आपण काय आहोत.
‘यू कॅन हील युवर लाइफ’ आणि इतर २६ पुस्तकांच्या लेखिका असलेल्या लुईस एल. हे या एक मार्गदर्शक आणि व्याख्याता आहेत.
तुम्ही कोण आहात?
तुम्ही इथे कशासाठी आला आहात?
तुमच्या आयुष्याविषयी कोणत्या समजुती आहेत?
या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे म्हणजे “अंतर्शोध” असं आपण हजारो वर्षांपासून मानत आलो आहोत; पण अंतर्शोध म्हणजे काय?
– लुईस एल. हे
Share
