Thodas Kadu Aani Khupch God By Aniket Deshpande (थोडंसं कडू आणि खूपच गोड)
Thodas Kadu Aani Khupch God By Aniket Deshpande (थोडंसं कडू आणि खूपच गोड)
Couldn't load pickup availability
माणूस हा नियतीच्या हातातले बाहुले आहे. तर आयुष्य ही एक प्रदीर्घ परीक्षाच असते; त्यातही एखाद्याच्या वाट्याला एकामागोमाग एक अवघड पेपर्स आले तर त्या व्यक्तीचा जणू कसच लागतो. आयुष्यात तब्बल ४५००० इंजेक्शन्स टोचून घेणे, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत दक्ष राहणे, साखरेचा हृदयावर घाला पडल्यावर चक्क नऊ वेळा अँजिओग्राफी, तीन वेळा स्टेंटिंग, एकदा बायपास करून घेणे आणि 'बचेंगे तो और भी लढेंगे' अशी जिद्द बाळगून आयुष्यभर जणू आनंदोत्सव साजरा करणे हे येरागबाळ्याचे काम निश्चितच नव्हे ! डॉक्टर अनिकेत जसा प्रामाणिक आणि पारदर्शक आहे, तसेच हे त्याचे आत्मपरीक्षण ! ओघवत्या शैलीतील हे कल्पनेपेक्षाही अकल्पित वास्तव वाचताना वाचकांना एका वेगळ्याच जगातील सहल करून आल्यासारखे वाटेल. पण केवळ रंजन हा यामागचा उद्देश नाही, तर हे एका वेगळ्या पातळीवरील प्रबोधनही आहे. हे पुस्तक ज्या लोकांना मधुमेह व इतर गुंतागुंती आहेत, अशांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही !
Share
