1
/
of
1
The Right To Sex By Amia Srinivasan, Dr. Asha Bhagwat(Translator) (द राइट टू सेक्स)
The Right To Sex By Amia Srinivasan, Dr. Asha Bhagwat(Translator) (द राइट टू सेक्स)
Regular price
Rs. 323.00
Regular price
Rs. 380.00
Sale price
Rs. 323.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सेक्स ही अशी गोष्ट आहे जी आपल्या सगळ्यांकडे आहे आणिआपण सगळे ती कृती करतो;सेक्स म्हणजे सार्वजनिक अर्थ असणारी तथाकथित खाजगी गोष्ट;सेक्स म्हणजे बाह्य शक्तींनी घडवलेली वैयक्तिक प्राधान्ये;सेक्स म्हणजे सुख आणि नीतिमत्ता या दोन टोकांमध्ये ताणली गेलेली गोष्ट;सेक्सला तिच्या सर्व गुंतागुंतीसहित; त्यातील सखोल विरोधाभासांसहित; लिंग, वर्ग, वंश आणि सत्ता यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्यासहित पूर्णत: समजून घ्यायचे असेल - तर आपल्याला ‘हो’ आणि ‘नाही’; ‘वांछित आणि अवांछित’ यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.डज एनी वन हॅव अ राईट टू सेक्स? असा दावा देखील कुणी करू शकतो का?सेक्स आणि सत्ता यांचे परस्पर संबंधित राजकारण नेमके काय आहे? स्त्रीवाद या प्रश्नांना कसे हाताळतो? व्यापक सामायिक हितासाठी हे प्रश्न नेमके कसे हाताळायला जायला हवेत? या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठीचे हे विचारमंथन आहे.पितृसत्ताक समाज व्यवस्था, भांडवलशाही आणि शासन पुरस्कृत वंशभेदी राजकारणाच्या विळख्यात अडकल्याने स्त्रीवादाचे कसे नुकसान झाले आहे, याचे मार्मिक चित्रणही या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच या विळख्यातून स्त्रीवादाची सुटका करण्याची गरज अधोरेखित करताना त्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न करावे लागतील, तत्कालीन स्त्रीवाद संकल्पनेत कोणत्या प्रकारचे बदल करावे लागतील, याची तर्कशुद्ध मीमांसा करण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे.
Share
