The Profet By Khalil Gibran (द प्रॉफेट)
The Profet By Khalil Gibran (द प्रॉफेट)
Couldn't load pickup availability
प्रेम तुम्हाला खुणावील तेव्हा त्यामागून चालू लागा. त्याच्या वाटा खडतर चढणीच्या
असतील. त्याच्या पंखांत पोलावाची पाती असतील. ती तुम्हाला जखमी करतील.
तुमची मुलं तुमची नसतात. ईथरी चैतन्याच्या आत्मीय प्रेरणेची ती पुत्र आणि कन्या
असतात. तुमच्यामधून ती जन्म घेतात. तुमच्यापासून नव्हे.
तुम्ही काम करता याचा अर्थ तुम्ही एक वासरी होऊन राहता, जिच्या अंतर्यामातून
प्रहराप्रहरांचे निःश्वास संगीत होऊन येतात. सगळं विद्य एकात्मतेनं गुंजार करीत
असताना, तुमच्या जीवनाची बासरी मुकी आणि अबोल कशी राहू शकेल?
कालसमुद्रावर संचार करणान्या सुमच्या जीवनौकेचा सुकाणू बुद्धीच्या हाती आहे.
तुमच्या भावना आणि वासना तिची शिडं आहेत. सुकाणू सुटला किंवा शिडं फाटली
तर काय होईल ?
मृत्यूचं रहस्य जाणून घ्यावं अशी तुम्ही इच्छा करता. पण जीवनाच्या ऐन धामधुमीत
ते न शोधाल तर तुम्हाला ते कसं गवसेल? जीवन आणि मृत्यू ही अभिन्न आहेत.
नदी आणि समुद्र यांच्यासारखी.
स्वप्नांवर विश्वास ठेवा. कारण त्यांच्यात तर अनंत अस्तित्वाकडे नेणारी वेस
उघडणारी असते.
माझे शब्द तुम्हाला संदिग्ध वाटत असतील, तरी ते तसेच घ्या. त्यांना साफसूफ
करायला बघू नका. आणखी एका स्वप्नात तुमचे-माझे हात जुळतील तर
आकाशात आणखी एक मनोरा उभा करूया.
Share
