The Obstacle Is The Way By Rayan Holiday, Nitin Salunkhe(Translator) (द ऑब्स्टॅकल इज द वे)
The Obstacle Is The Way By Rayan Holiday, Nitin Salunkhe(Translator) (द ऑब्स्टॅकल इज द वे)
Couldn't load pickup availability
या जगातील महान यशस्वी लोकांकडे कोणती विशेष बुद्धिमत्ता, भाग्य किंवा जगावेगळा अनुभव नसतो. त्यांच्या जगण्याचं एक सूत्र असतं 'मार्गातले अडथळे हाच यशाचा, ध्येयप्राप्तीचा मार्ग असतो'. हे जगण्याचं तत्त्वज्ञान सुमारे २००० वर्षांपूर्वी विकसित झालंय आणि युद्धमैदानावर तसेच कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्येही ते वापरलं गेलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्केटिंग गुरू आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे द ऑबस्टॅकल इज द वे या पुस्तकात याच तत्त्वज्ञानाची आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी पुनर्मांडणी करतात आणि हेही उलगडतात : जॉन डी. रॉकफेलरने प्रतिकूलतेतही संधी कशी शोधली आणि मंदीतही तो श्रीमंत कसा झाला? महात्मा गांधींनी त्यांच्या दुर्बलतेलाच शक्तिस्थान कसे बनवले आणि शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला कसे नमते घ्यावे लागले ? स्टीव्ह जॉब्जने अशक्य ते शक्य कसे साध्य केले? तुमचा दृष्टिकोन बदला. तुम्ही परिस्थिती बदलू शकता हे समजून घ्या. तुमच्या कृतींना योग्य दिशा द्या आणि मार्गातल्या प्रत्येक अडथळ्याला, संकटाला संधीत रूपांतरित करा. 'हे पुस्तक वाचायलाच हवं. मार्गातल्या अडचणींवर मात करण्याची आणि कोणतीही समस्या सोडवण्याची कला शिकवणारं पुस्तक !' जिमी सोनी, द हफिंग्टन पोस्टचे एम.डी., रोम्स लास्ट सिटिझनचे लेखक.
Share
