The Nutmegs Curse By Amitav Ghosh, Pranav Sakhadev(Translators) ( द नटमेग्ज कर्स )
The Nutmegs Curse By Amitav Ghosh, Pranav Sakhadev(Translators) ( द नटमेग्ज कर्स )
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
बॅंडा बेटं... जावाच्या पूर्वेकडे असलेल्या छोट्या छोट्या ज्वालामुखीय बेटांचा समूह. जायफळाची मूळ भूमी. १८ व्या शतकाआधी प्रत्येक जायफळ या भूमीत निर्माण होत असे. जेव्हा या जायफळाने ज्ञात जगामध्ये शिरकाव केला, तेव्हा १६ व्या शतकात युरोपात त्याची किंमत प्रचंड वाढली. मूठभर जायफळ देऊन घर विकत घेता येत असे! म्हणून या मौल्यवान उत्पादनासाठी युरोपीय व्यापार्यांनी हा प्रदेश जिंकून घेतला आणि देशज बॅंडावासीयांची कत्तल केली. या छोट्या बेटांची ही रक्तरंजित नियती आजही आपल्या पृथ्वीवर संकट होऊन घोंघावताना दिसते आहे...
जायफळाचा हिंसक प्रवास म्हणजे व्यापक वसाहतवादी दृष्टिकोनाचा भाग आहे, अशी मांडणी अमिताव घोष करतात. मानवी जगणं आणि पर्यावरण यांचं शोषण करणं हे या दृष्टिकोनाचं मूलतत्त्व आहे, जे भूजराजकीय प्राबल्यामध्येही दिसून येत.