Skip to product information
1 of 1

The Last Courtesan By Manish Gaikwad (द लास्ट कोर्टसान)

The Last Courtesan By Manish Gaikwad (द लास्ट कोर्टसान)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

१९९३ मधील बो बाजार बॉम्बस्फोटामुळे कोलकाता येथील व्यस्त व्यावसायिक जिल्ह्यातील कोठा संस्कृतीचा अंत झाला. पुढच्या काही वर्षांत डान्स बार आणि डिस्को म्युझिकने मुजरा, कथ्थक आणि ठुमरी या जुन्या काळातील मंत्रमुग्ध करणाऱ्या कलांची जागा घेतल्याने तवायफांनी आपला व्यवसाय सोडण्यास सुरुवात केली. रेखाबाई या तवायफसमोर अनिश्चित भविष्यकाळ उभा ठाकला होता. तिने कुठे जावे? तिने पुढे काय करावे?

रेखाबाई मुळात कंजारभाट जमातीतील. तिला अत्यंत कोवळ्या वयात विकले गेले आणि तवायफ बनण्याचे धडे दिले गेले. १९८० च्या दशकात कोठ्यांना अभिजात कलेचा मान मिळत नव्हता. तो अदाकारीच्या वेषात असलेला वेश्याव्यवसाय आहे, अशी समाजाची समजूत होती. त्यामुळे तवायफच्या कलेला नाकारले गेले. अशा काळात रेखाबाईंनी कलकत्ता आणि बॉम्बेमध्ये एक गायन- नृत्य करणारी प्रसिद्ध कलावंत म्हणून नाव कमावले. तो एक काळ होता, जेव्हा तिला बंदुका, गुंड आणि गालिबच्या गझलांना हुलकावणी देऊन स्वतःची नियती घडवायची होती. मोठ्या कुटुंबाचा गुजारा करायचा होता. शिवाय मुलाला इंग्रजी माध्यमाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये वाढवायचे होते.

या हृदयस्पर्शी आठवणीत, तिने कधीही बेताल न होता आपल्या मुलाजवळ तिच्या जगण्याची भावनांनी ओतप्रोत भरलेली अविश्वसनीय कहाणी प्रामाणिकपणे, औचित्यपूर्ण आणि खेळकर शैलीत कथन केली आहे.

View full details