The Hidden Hindu Bhag 1.2 & 3 By Akshat Gupta
The Hidden Hindu Bhag 1.2 & 3 By Akshat Gupta
Couldn't load pickup availability
The Hidden Hindu Bhag 1.2 & 3 By Akshat Gupta
The Hidden Hindu Bhag 1
"एकवीस वर्षांचा पृथ्वी ओम शास्त्री या मध्यमवयीन रहस्यमय अघोरीच्या शोधात आहे, ज्याला पकडून एकाकी असलेल्या एका भारतीय बेटावरच्या उच्च तंत्रज्ञानानी युक्त अशा सुविधाकेंद्रात नेऊन ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या अघोरीला औषधांच्या अंमलाखाली संमोहित करून तज्ज्ञ लोकांच्या टीमनं प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्यानं हिंदू पुराणांमध्ये वर्णन केलेल्या चारही युगांचा साक्षीदार असल्याचा आणि रामायण व महाभारतातल्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा दावा केला.
The Hidden Hindu Bhag 2
"ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २` मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा.
The Hidden Hindu Bhag 3
देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतातून पुनरुत्थित झाला आहे. असुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. परशुराम आणि कृपाचार्य ओमच्या कोलमडलेल्या भूतकाळात अडकले आहेत तर वृषकपी निश्चित मृत्यूशी लढत आहेत, ज्याने आधीच मिलारेपाला संपवलं आहे.
Share


