The God Delusion By Richard Dawkins (Author), Mugdha Karnik (Translator)
The God Delusion By Richard Dawkins (Author), Mugdha Karnik (Translator)
Couldn't load pickup availability
देवावर श्रद्धा असणारे आस्तिक व देवावर विश्वास नसणारे नास्तिक, असा वाद तर सतत घडत असतो. प्रा. रॉबर्ट रिचर्ड डॉकिन्स यांनी विश्व हे देवाने निर्मिले, या समजुतीचा वैज्ञानिक विरोध करीत निरीश्ववादाचा पुरस्कार केला आहे. 'द गॉड डिल्यूजन'या पुस्तकातून त्यांनी ही संकल्पना विशद केली आहे. जागरूक करण्याचे काम त्यांनी यातून केले आहे. देव असण्याचे गृहितक यांच्यातील मांडणी, देवाच्या अस्तित्वासंबंधीचे युक्तिवाद, विश्व कसे कसे घडत गेले, याबद्दल डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे स्पष्टीकरण, सर्व प्रकारच्या श्रद्धा सारख्या पद्धतीने का उत्पन्न होतात, सज्जनपणासाठी देवाची गरज आहे? समाज व जगासाठी धर्म काय करतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रयत्न केला आहे. धर्म व बाल्य यावरही चर्चा केली आहे. धर्मातून काही प्रेरणा मिळते, या दाव्यापेक्षा विश्वाची समज वाढविणे, हीच प्रेरणादायी प्रक्रिया आहे, हे यातून स्पष्ट केले आहे. याचा , मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला आहे.
Share
