The Art Of Bitfulness (Marathi) By Nandan Nilekani, Tanuj Bhojwani, Shuchita Nandapurkar- Phadake(Translators) द आर्ट ऑफ बिटफुलनेस (मराठी)
The Art Of Bitfulness (Marathi) By Nandan Nilekani, Tanuj Bhojwani, Shuchita Nandapurkar- Phadake(Translators) द आर्ट ऑफ बिटफुलनेस (मराठी)
तुमचं तंत्रज्ञान तुम्हाला वेड लावत आहे का?
आपल्या डिव्हाईसेससोबत आपलं नातं फार दूषित टॉक्सिक झालं आहे. काम आणि घर यांतली सीमारेषा पूर्वर्वीपेक्षा अधिक अंधूक झाली आहे. आपल्यावर सातत्याने होणाऱ्या माहितीच्या भडिमारापायी आपल्या मनःशांतीवर परिणाम होत आहे. हे योग्य नाही याची आपल्याला जाणीव आहे. तरीही, पुनःपुन्हा स्क्रोल करण्यापासून आपण स्वतःला थोपवू शकत नाही.
इंटरनेट टाळता येत नसलं, तरी त्यासोबत असलेलं आपलं नातं बदलता येऊ शकतं.
‘द आर्ट ऑफ बिटफुलनेस’ या पुस्तकातून तुम्ही आणि इंटरनेटचा महापूर यांत आरोग्यदायी सीमारेषा निर्माण करायला मदत होईल. आपला वेळ, गोपनीयता आणि अवधान परत मिळवण्यासाठी त्यातून नवीन प्रणाली समोर येतील. हे। हे पुस्तक तंत्रज्ञानाशिवाय कसं जगायचं याबद्दल नसून, तंत्रज्ञानासह कसं जगायचं याबद्दल आहे.
तुमच्या डिव्हाईसेसबरोबर कमी काळ घालवणं हे इथे उद्दिष्ट नसून, तुमच्या डिव्हाईसेसबरोबरचा वेळ चांगला घालवणं, हे आहे.
मुळात आम्ही इथवर कसे आलो, हेदेखील तुम्हाला या पुस्तकातून समजेल. आपलं तंत्रज्ञान आपल्याला मुक्त करण्याऐवजी मर्यादा का घालतं? ‘द आर्ट ऑफ बिटफुलनेस’मधून प्रत्येकासाठी तंत्रज्ञान उभारण्याचा नवा मार्ग समोर येतो. ‘जो जिंकेल त्याचंच सगळं’ हा दृष्टिकोन इथे नाही.
या पुस्तकाचे दोन्ही लेखक डिजिटल जगाचे तज्ज्ञ आहेत. समाजाचं रूपांतर करण्याच्या तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेबद्दल ते आशावादी आहेत; परंतु तिथवर पोहोचण्यासाठी काय घडायला हवं, याबाबत ते व्यावहारिक दृष्टिकोन बाळगतात.
हे पुस्तक तंत्रज्ञानविरोधी नाही, तर हे पुस्तक तुम्हाला धार्जिणं आहे.