Skip to product information
1 of 1

Ten Yancha Vangmaysiddhant By Suresh Dhayagude, D. D. Punde (तेन यांचा वाङ्मयसिद्धांत)

Ten Yancha Vangmaysiddhant By Suresh Dhayagude, D. D. Punde (तेन यांचा वाङ्मयसिद्धांत)

Regular price Rs. 106.00
Regular price Rs. 125.00 Sale price Rs. 106.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

प्रो . तेन यांनी आपला ‘ वाङ्मयसिद्धान्त ‘ फ्रेंचमध्ये १८६४ मध्ये मांडला . त्याचे १८६१ मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले . गेली एकशेपन्नासाधिक वर्षे जगभरचे अभ्यासक या सिद्धान्ताची सातत्याने चर्चाचिकित्सा करीत आलेले आढळतात . विशेषत : ‘ वंश ‘ ( Race ) , ‘ वातावरण ‘ ( Milieu ) व ‘ वेला ‘ ( Moment ) ही तेनची तत्त्वत्रयी अभ्यासकांना निरनिराळ्या प्रकारांनी विचार करायला लावणारी आहे . या त्रयीखेरीज तेन यांनी इतरही महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत . महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ‘ राष्ट्र व राष्ट्रीयते’चाही सुदीर्घ विचार केलेला आहे . आज भारतात आणि विशेषत : महाराष्ट्रात वाङ्मयाच्या सामाजिक अभ्यासाने जोर धरलेला आहे . दलित , ग्रामीण , भटके , आदिवासी , गिरिजन साहित्यकृतींनी वाङ्मयाच्या सामजिक समीक्षेची गरज अधोरेखित केलेली आहे . याशिवाय सध्या आपण ‘ भारतीय वाङ्मया’च्या संकल्पनेचाही गंभीरपणाने विचार करीत आहोत . त्यामुळे तेनच्या सिद्धान्ताचे नव्याने अवलोकन होणे गरजेचे झालेले आहे . प्रस्तुत पुस्तकाद्वारे तेनच्या सिद्धान्ताचे यथामूल व सुविहित भाषांतर प्रथमच मराठीत येत आहे . मराठीबरोबर हिंदी व इंग्रजीच्या अभ्यासकांनादेखील हे भाषांतर उपयोगाचे ठरेल 

View full details