Tata Stories By Harish Bhat, Vyankatesh Upadhye (टाटा स्टोरीज)
Tata Stories By Harish Bhat, Vyankatesh Upadhye (टाटा स्टोरीज)
Couldn't load pickup availability
हरीश भट यांनी या पुस्तकात सांगितलेल्या संस्मरणीय कथांद्वारे टाटा समूहाचा संपन्न इतिहास आणि समृद्ध वारसा जिवंत होतो. राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या आणि नव्या क्षितीजांना गवसणी घालणाऱ्या या गोष्टींमध्ये आपल्या सर्वांसाठीच अनेक महत्त्वपूर्ण धडे सामावले आहेत.'
- एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा सन्स
टाटांना राष्ट्रनिर्मितीचा १५० हून अधिक वर्षांचा वारसा लाभलेला आहे. या प्रदीर्घ कालखंडाच्या क्षितिजावर आहेत आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, प्रोत्साहित करणाऱ्या आणि त्याचबरोबर स्वत:च्या आयुष्यात अर्थपूर्ण कार्य करण्यास चालना देणाऱ्या अनेक सुंदर आणि विस्मयकारक कथा.
आर्थिक संकटावर मात करत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी गहाण ठेवलेला प्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याच्या दुप्पट आकाराचा हिरा; पुढे स्वामी विवेकानंद या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका अनोळखी तरुण संन्याशाशी भेट; ऑलिम्पिक्समधील पहिल्यावहिल्या भारतीय चमूची रोमहर्षक कथा; भारताच्या पहिल्या व्यावसायिक एअरलाइनची आणि पहिल्या भारतीय कारची निर्मिती; भारतीय महामार्गांवरील लाखो ट्रक्सच्या मागील भागावर लिहिलेल्या 'ओके टाटा'ने निर्माण केलेले स्थान; हरूनही जिंकलेली विख्यात शर्यत आणि अशा अनेक कथा.
#टाटा स्टोरीज हा टाटा समूहातील व्यक्ती, घडामोडी आणि स्थळांच्या अनवट कथांचा असा संग्रह होय ज्यांनी आजच्या भारताला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली.
Share
