Tankat By Rajan Gavas (तणकट)
Tankat By Rajan Gavas (तणकट)
Couldn't load pickup availability
गेल्या दोन-तीन दशकात समाजकारणातील आणि राजकारणातील दिशाहीनता आणि मूल्यभ्रष्टता यांचा विदारक दस्तऐवज असे राजन गवस यांच्या 'तणकट' या कादंबरीचे यथार्थ वर्णन करता येईल. विविध जातीतील नवशिक्षित तरुणांना हतबल करून टाकणारे समकालीन वास्तव गवस यांनी प्रवाहीपणे मांडले आहे. ज्वलंत समस्या, आदर्शाचे विडंबन, मूल्यांचा हास आणि चळवळींच्या विपरीत फोफावण्यातून जाणवणारी उपक्रमशीलतेची निरर्थकता यांचे सावट मानवी संबंधातील मौलिकता कशी ग्रासून टाकते याचे शोकात्म प्रत्यंतर म्हणजे 'तणकट.' निखळ स्वार्थाच्या एकलक्ष्यी पूर्तीसाठी लागणारी अविचारी आक्रमकता आणि मूल्यविवेकाच्या जोपासणीतून जन्मणारी असहायता यातील चिरंतन द्वंद्व बाळासाहेब शेडबाळे आणि कबीर या व्यक्तिरेखा जिवंतपणे साकारतात. कागदी प्रसिद्धीच्या आधुनिक तंत्रातून निर्माण झालेल्या बेगडी नेतृत्वाची निरंकुश सत्तालोलुपता गवस यांनी दाहकपणे चित्रित केली आहे. व्यापक उलाढालींचा व्यक्तीव्यक्तींच्या संबंधावर होणारा गुंतागुंतीच्या प्रभाव अत्यंत सूक्ष्मतेने या कादंबरीत येतो हे 'तणकट' या कादंबरीचे यश आहे. वर्तमानाची जटिलता अधिकृत इतिहासात हरवून जाते या तत्त्वाची प्रतीती कादंबरी आणि इतिहास-लेखन यात तफावत करण्यासाठी उपयुक्त ठरते.
Share
