Tanaji Ani Khajinyacha Shodh By Shraddha Sahi, Surshree Joshi (Translator) (तानाजी आणि खजिन्याचा शोध)
Tanaji Ani Khajinyacha Shodh By Shraddha Sahi, Surshree Joshi (Translator) (तानाजी आणि खजिन्याचा शोध)
Couldn't load pickup availability
१० वर्षाची प्राजक्ता जिवाच्या आकांताने सर्व गावकऱ्यांना मुघलांच्या हल्ल्याबाबत सावध करण्यासाठी पळत जाते; पण ती तिच्या घराण्यातील मौल्यवान दागिन्यांची चोरी काही थांबवू शकत नाही. तो लुटलेला खजिना तिच्या भावाला, सर्जाला, एका गुप्त गुहेत अचानक सापडतो. तो हार मिळणे म्हणजे चमत्कारच की! मुलं बाकीचा खजिना हिंदवी स्वराज्याच्या मदतीसाठी देणगी म्हणून देतात. त्यामुळे शिवाजीराजांचे सर्वांत विश्वासू सरदार, तानाजी मालुसरे, त्यांच्यावर खूप खूश होतात; पण मुलांचं दुर्दैव काही त्यांची पाठ सोडत नाही… कारण एक डोळा आणि चेहऱ्यावर व्रण असलेला खलनायक तो दागिना मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. तो दुष्ट मुघल दसऱ्याच्या दिवशी सर्जाचं अपहरण करतो! प्राजक्ता तिच्या भावाला वाचवू शकेल का? हा चेहऱ्यावर व्रण असलेला माणूस मुलांच्या मागे का लागला आहे? हे गुप्त भुयार नक्की कुठे जातं? स्वराज्यात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या किल्ल्याच्या लढाईत ह्या धाडसी मराठा मुलीची नेमकी काय भूमिका असेल? ‘लहान मुलांसाठी आणि मनाने तरुण असणाऱ्यांसाठी रोमांचक, ऐतिहासिक, साहसी कथा.’ – देबेशी गुप्तू (लेखिका)
Share
