Tamasha : Maharashtrachi Lokkala By Sopan Khude Kolhalkar (तमाशा महाराष्ट्राची लोककला)
Tamasha : Maharashtrachi Lokkala By Sopan Khude Kolhalkar (तमाशा महाराष्ट्राची लोककला)
Couldn't load pickup availability
तमाशा ही महाराष्ट्राची खरी लोककला आहे. राजाश्रय, लोकाश्रय लाभल्यामुळे ती बहरली, मोहरली. मराठी माणसांच्या मनामनात रुजत गेली. मराठी लोकजीवनात एकरूप झाली. तरीदेखील तमाशा अभ्यासकांशिवाय इतर मराठी माणसे तमाशाबद्दल माहिती करून घेत नाहीत. त्यामुळे तमाशाबद्दलच्या चुकीच्या गोष्टींनी त्यांच्या मनात ठाण मांडलेले आहे. आपण जर एखाद्याला विचारले की, ‘तमाशाचा जनक कोण?’ तर उत्तर मिळते, ‘पढे बापूराव.’ ‘तमाशात पहिला वग कुणी सादर केला?’ तर त्याचेही उत्तर ‘पष्ठे बापूराव’ असेच येते. तमाशात भैरवी म्हणायला कधी सुरुवात झाली? तमाशात पायपेटी कधी आली? तमाशासाठी बालगंधर्वांचे योगदान काय? अण्णा भाऊ साठे यांचे योगदान काय? हे प्रश्न तर विचारायलाच नकोत. मात्र, लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक सोपान खुडे यांचे ‘तमाशा : महाराष्ट्राची लोककला’ हे पुस्तक वाचल्यानंतर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तमाशावद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक मराठी वाचकांनी, अभ्यासकांनी वाचणे आणि आपल्या संग्रही ठेवणे अत्यावश्यक आहे. संदीप भानुदास तापकीर (इतिहास अभ्यासक व लेखक)
Share
