1
/
of
1
Swarchandrika By Sangita Godbole (स्वरचंद्रिका)
Swarchandrika By Sangita Godbole (स्वरचंद्रिका)
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
काळाच्या भाळावर नाममुद्रा उमटवणाऱ्या पद्मजा फेणाणी जोगळेकर ह्या मधुरकंठी गायिकेच्या बहुविध ‘गाण्यांच्या गोष्टी’ तर या ग्रंथात आहेतच, शिवाय संगीतात केलेले विविध लालित्यपूर्ण नि रसाळ प्रयोगही आहेत. एक माणूस म्हणून, एक कन्या म्हणून, एक शिष्या म्हणून, एक बाई आणि पत्नी म्हणून, कुटुंबवत्सल आई म्हणून तसेच रसिकांशी सहज आत्मीय संवाद साधणारी बोलकी व्यक्ती म्हणूनही पद्मजाताई आपल्याला भेटते. ते फारच महत्त्वाचे नि मौलिक आहे.
ह्या गौरवग्रंथात कोणी कोणी लिहिले आहे? भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी काय म्हटले आहे? किंवा माजी पंतप्रधान, भारतरत्न कविवर्य अटलबिहारी वाजपेयींचा आशीर्वाद कसा मिळाला? विदुषी लेखिका दुर्गाबाई भागवत, आपले लाडके पु. ल. ऊर्फ भाईकाका ,कविवर्य ग्रेस , शंकर रामाणी आणि अन्य लेखक, कवी यांनी काय म्हटले आहे? संगीत क्षेत्रातल्या पं .जसराजजी , पं रामनारायणजी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर या गुरुंबरोबरच इतर नामवंत मंडळींनी काय लिहिलंय? विविध राजकीय व्यक्ती, शास्त्रज्ञ, उद्योगपती, आयोजक यांचे कोणते अभिप्राय आहेत, हे मी सांगणार नाही. प्रसिद्ध साऊंड इंजिनियर अविनाशजी ओक,, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, श्रीमती शिरीष पै, नौशादजी यांनी कोणते गौरवोद्गार काढले, हेही मी सांगणार नाही. ते आपण आतल्या पानोपानी सचित्र वाचणार आहातच.
Share
