Swadheen Ki Daivadheen By R G Salavi (स्वाधीन कि दैवाधीन)
Swadheen Ki Daivadheen By R G Salavi (स्वाधीन कि दैवाधीन)
दुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या मेजर साळवी यांची रोमहर्षक सत्य युद्धकथा. 'स्वाधीन की दैवाधीन ?' ही एका सैनिकाची किंवा युद्धबंद्याची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथेतून प्रकट होत असेल तर ती माणुसकीची भावना. जाती, धर्म, भाषा, देश इत्यादी मानवनिर्मित भेदांनी जखडली न जाणारी, या भेदाचे अडथळे न जुमानणारी माणुसकीची भावना. एका युद्धकथेतून ही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रगट व्हावी हे या पुस्तकात ग्रथित झालेल्या भीषणरम्य अनुभवाचे लक्षणीय यश आहे. या अनुभवकथेचे आभाळ ढगाळलेले आहे, कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वादळ, कानठळ्या बसविणाऱ्या मेघगर्जना, काळाकिट्ट अंधार असल्या वातावरणातून ही मेजर रा. गो. साळवी यांची कल्पनेलाही लाजविणारी युद्धकथा प्रवास करीत आहे. शौर्य, शिस्त, सावधानता, प्रसंगावधान, क्रौर्य, उपासमार, आशा, हतबुद्धता, असहाय्यता इत्यादींच्या छाया प्रकाशांनी तिचा मार्ग अथपासून इतिपर्यंत रंगलेला आहे.